फोटो सौजन्य - बीसीसीआय वुमन
ICC Womens World Cup 2025 First Match : आयसीसी महिला विश्वचषक 2025 ला आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघांचा खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या विश्वचषकाचा पहिला सामना हा गुवाहाटी येथे रंगणार आहे. भारताच्या संघासाठी पहिला सामना हा फार महत्वाचा असणार आहे टीम इंडिया त्यांच्या घरच्या मैदानावर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात विजयाचा हेतूनेच मैदानात उतरेल. विश्वचषक सुरू होण्याआधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील हेट टू हेड आकडेवारी कशी आहे कोणाचे पारडे जड आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आत्तापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहे यामध्ये 31 सामने हे भारताच्या संघाने जिंकले आहेत तर तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाला विजय मिळाला आहे. या आकडेवारी मध्ये टीम इंडियाचे पारडे हे जड पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघाच्या शेवटचा सामना हा मे महिन्यात झाला होता. तीन देशांमध्ये ट्राय सिरीज खेळवण्यात आली होती यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांना पराभूत करून भारताच्या संघाला ट्राय सिरीज जिंकली होती.
ट्राय सिरीजच्या फायनल च्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला 97 धावांनी पराभूत करून मालिका नावावर केली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून स्मृती मानधनहीने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. स्मृती मानधनाहीने आतापर्यंत 529 धावा एक दिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंके विरुद्ध केले आहे. स्मृती सध्या दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये तिने सलग दोन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली.
The hosts have their eyes on their first ICC title 👊 Only 4 days to go before #TeamIndia begin their #CWC25 campaign! 🔥#CWC25 👉 #INDvSL | TUE, SEP 30, 2 PM on Star Sports & JioHotstar | #BelieveInBlue pic.twitter.com/TtOdp4G0th — Star Sports (@StarSportsIndia) September 26, 2025
भारतीय संघाच्या गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाच्या स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा या दोघींनी हे श्रीलंके विरुद्ध प्रत्येकी 12 विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेने शेवटचा सामना हा भारताविरुद्ध 2024 मध्ये आशिया कपच्या फायनल मध्ये जिंकला होता. त्यामुळे श्रीलंकेचा संघ टीम इंडिया समोर आव्हान उभे करू शकतो. भारताचा संघ हा त्याच्या घरच्या मैदानावर हा विश्वचषक खेळणार आहे त्यामुळे टीम इंडिया या विश्वचषकामध्ये प्रेक्षकांची आवडती असणार आहे.