Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ४१ वर्षांत प्रथमच IND VS PAK अंतिम सामन्याचा थरार! जाणून घ्या आशिया कपचा इतिहास 

आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. आशिया कप स्पर्धेतील ४१ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्याची रंगत वाढली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 26, 2025 | 03:44 PM
Asia cup 2025: The thrill of the final match between IND VS PAK for the first time in 41 years! Know the history of Asia Cup

Asia cup 2025: The thrill of the final match between IND VS PAK for the first time in 41 years! Know the history of Asia Cup

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने 
  • ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात
  • अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार 
Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे.  आज शेवटचा सुपर ४ सामना भारत आणि  श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत पोहचले आहेत. अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जिथे भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा प्रसंग खूप खास असणार आहे. कारण आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात लढत देणार आहेत.

आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली आणि सध्याचा आशिया कपचा हा  १७ वा हंगाम आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळवली जात आहे. यापूर्वी, २०१६ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा टी २० स्वरूपात खेळवली गेली होती. आता क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा : रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो

आशिया कपचा इतिहास जाणून घेऊया..

  • १९८४ मध्ये युएईमध्ये खेळलेला पहिला आशिया कप श्रीलंकेला पराभूत करत भारताने जिंकला.
  • १९८६ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत विजेतेपद पटकावले होते.
  • १९८८ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या आशिया कपमध्ये भारताने पुन्हा श्रीलंकेला हरवून या स्पर्धेचे जेतेपद  जिंकले होते.
  • १९९० मधील चौथ्या आशिया कप स्पर्धेत भारताने पुन्हा श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले.
  • १९९५ मध्ये युएईमध्ये झालेल्या पाचव्या आवृत्तीत भारताने श्रीलंकेलाही हरवले.
  • १९९७ मध्ये श्रीलंकेने पुनरागमन करत भारताला हरवून त्यांचा सहावा आशिया कप जिंकला होता.
  • २००० मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या सातव्या आशिया कपमध्ये, पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करून पहिले विजेतेपद जिंकले.
  • २००४ मध्ये श्रीलंकेने भारताला हरवून विजेतेपद जिंकले.
  • २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये खेळण्यात आलेल्या स्पर्धेत, श्रीलंकेने भारताला हरवून विजय मिळवला होता.
  • २०१० मध्ये भारता श्रीलंकेला हरवून विजेतेपद जिंकले.
  • २०१२ मध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने बांगलादेशला हरवून विजेतेपद पटकावले.
  • २०१४ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करून आशिया कप जिंकला होता.
  • २०१६ मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच टी२० स्वरूपात खेळली गेली, या वेळी भारताने बांगलादेशला हरवून विजेतेपद पटकावले.
  • २०१८ मध्ये युएईमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत भारताने बांगलादेशला हरवून विजेतेपद जिंकले होते.
  • २०२२ मध्ये, आशिया कप दुसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळला गेला. ज्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केले होते.
  • २०२३ मध्ये आशिया कप स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेने संयुक्तपणे आयोजित केला होता. ज्यामध्ये  भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद जिंकले होते.

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचा थरार

भारत आशिया कप स्पर्धेत अव्वल राहीला आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि  पाकिस्तान अनेक वेळा एकमेकांसमोर आले असले तरी, या दोन संघात आजवर आशिया कप इतिहासात कधीच  अंतिम सामना खेळला गेला नाही. म्हणूनच २०२५ चा अंतिम सामना ऐतिहासिक सामना असणार आहे कारण भारत आणि पाकिस्तान ४१ वर्षात पहिल्यांदा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत.

हेही वाचा : तस्किन अहमदने रचला इतिहास! बांगलादेशसाठी टी२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम

 

Web Title: The thrill of the final match of ind vs pak in asia cup for the first time in 41 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!
1

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे
2

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.