IND Vs END: 'They called me and told me to retire', Karun Nair's sensational revelation before the England series
IND Vs END : नुकतीच जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला आहे. या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आयसीसीचे जेतेपद पटकावले आहे. आता सर्वांना भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे वेध लागले आहे. २० जूनपासून भारत आणि इंग्लंड या डॉन संघातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघात अनेक नवीन चेहऱ्यांना संधि देण्यात आली आहे. संघाची धुरा युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या अनुषंगाने करुण नायरची चर्चा होत आहे. तो २०१८ नंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे.
नायरने भारतीय संघात परतण्यासाठी खूप संघर्ष केलाया आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्या दमदार कामगिरीमुळे तो ७ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकला आहे. आता करुण नायरने त्याच्या वाईट दिवसांची आठवण करून देताना एक धक्कदायक खुलासा केला आहे.
हेही वाचा : WC 2025: दोन देशात तणाव, तरीही रंगणार भारत-पाकिस्तान सामना! ICC कडून Women’s World Cup चे वेळापत्रक जाहीर
करुन नायरने डेली मेलला मुलाखत देताना म्हटले की, “मला अजूनह देखील आठवते की एका आघाडीच्या भारतीय क्रिकेटपटूने मला फोन करून सांगितले होते की तू निवृत्ती घ्यावी, कारण या लीगमधून मिळत जाणाराय पैसा मला चांगले भविष्य मिळवून देण्यात मदत करेल. हे करणे सोपे आहे, परंतु मला माहित होते की पैसे असून देखील मी इतक्या सहजपणे निवृत्ती घेतली तर स्वतःला शाप दिला असता.” असे नायरने सांगितले.
🇮🇳 Karun Nair revealed a prominent Indian cricketer once told him to retire and chase money in T20 leagues.
Now, after 8 years, he’s back in India’s Test squad for the England series 🏏🔥
Source: Mail Sport#KarunNair #TeamIndia #CricketNews #HKChronicle pic.twitter.com/gWHgi3bK7W — HK Chronicle (@HK_Chronicle_) June 16, 2025
करुण नायर पुढे म्हणाला की, “मी पुन्हा भारतासाठी खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची हार मानू इच्छित नव्हतो. हे तर केवळ दोन वर्षांपूर्वीचे होते आणि आता आपण कुठे आहोत ते पहा. हे वेडेपणाचे असले तरी मला आतून माहित होते की मी खूप चांगले काही करत आहे.”
हेही वाचा : BCCI : कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर कुऱ्हाड! BCCI ने घेतला मोठा निर्णय, वाचा कुणाला किती पगार?
करुण नायरला २०१८ मध्ये टीम इंडियामधून वगळण्यात आले होते. त्यानंतर, करुण नायरने अनेक वेळा काउंटी क्रिकेटमध्ये देखील सहभाग घेतला. या काळात त्याने चांगली कामगिरी देखील करून दाखवली. त्याच वेळी, करुण नायरने विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी या स्पर्धांमध्ये शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी काही दमदार खेळी देखील केल्या होत्या. आता तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी खेळण्यास सज्ज झाला आहे.