भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट टीम(फोटो-सपक्षल मीडिया)
Women’s World Cup 2025 : आयसीसीकडून महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हे वेळापत्रक जाहीर करतान म्हटले आहे की, ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात, या स्पर्धेत, पाकिस्तान महिला क्रिकेट संघ हायब्रिड मॉडेलवर खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार महिला विश्वचषक २०२५ ला यावर्षी ३० सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या दरम्यान, स्पर्धेचा पहिला सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर भारत ५ ऑक्टोबर रोजी आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे . हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
पाकिस्तान संघ सेमीफायनल-१ मध्ये जर पोहोचू शकला, तरच हा सामना कोलंबो येथे होणार आहे. जर असे झाले नाही तर गुवाहाटी येथे सेमीफायनल सामना आयोजित करण्यात येईल. स्पर्धेचा सेमीफायनल सामना २० किंवा ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास तो २ तारखेला खेळवण्यात येणार आहे. यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पहिला कोलंबो आणि दुसरा बेंगळुरू येथे हा सामना होऊ शकतो.
The countdown begins ⏳ The full schedule for the ICC Women’s Cricket World Cup 2025 is out 🗓 Full details ➡ https://t.co/lPlTaGmtat pic.twitter.com/JOsl2lQYpy — ICC (@ICC) June 16, 2025
हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाच्या बसमध्ये Rohit Sharma च्या सीटवर कुणाचे राज्य? कुलदीप यादवने केला मोठा खुलासा..
• ३० सप्टेंबर (मंगळवार): भारत विरुद्ध श्रीलंका – बेंगळुरू
• १ ऑक्टोबर (बुधवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – इंदूर
• २ ऑक्टोबर (गुरुवार): बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
• ३ ऑक्टोबर (शुक्रवार): इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – बेंगळुरू
• ४ ऑक्टोबर (शनिवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
• ५ ऑक्टोबर (रविवार): भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
• ६ ऑक्टोबर (सोमवार): न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – इंदूर
• ७ ऑक्टोबर (मंगळवार): इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – गुवाहाटी
• ८ ऑक्टोबर (बुधवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
• ९ ऑक्टोबर (गुरुवार): भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – विशाखापट्टणम
• १० ऑक्टोबर (शुक्रवार): न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
• ११ ऑक्टोबर (शनिवार): इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – गुवाहाटी
• १२ ऑक्टोबर (रविवार): भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विशाखापट्टणम
• १३ ऑक्टोबर (सोमवार): दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
हेही वाचा : BCCI : कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर कुऱ्हाड! BCCI ने घेतला मोठा निर्णय, वाचा कुणाला किती पगार?
• १४ ऑक्टोबर (मंगळवार): न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका -कोलंबो
• १५ ऑक्टोबर (बुधवार): इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
• १६ ऑक्टोबर (गुरुवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
• १७ ऑक्टोबर (शुक्रवार): दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
• १८ ऑक्टोबर (शनिवार): न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान -कोलंबो
• १९ ऑक्टोबर (रविवार): भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूर
• २० ऑक्टोबर (सोमवार): श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
• २१ ऑक्टोबर (मंगळवार): दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
• २२ ऑक्टोबर (बुधवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – इंदूर
• २३ ऑक्टोबर (गुरुवार): भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
• २४ ऑक्टोबर (शुक्रवार): पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
• २५ ऑक्टोबर (शनिवार): ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – इंदूर
• २६ ऑक्टोबर (रविवार):
• इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड -गुवाहाटी
• भारत विरुद्ध बांगलादेश – बेंगळुरू
• २९ ऑक्टोबर (बुधवार): पहिला उपांत्य सामना – गुवाहाटी किंवा कोलंबो
• ३० ऑक्टोबर (गुरुवार): दुसरा उपांत्य सामना – बेंगळुरू
• २ नोव्हेंबर (रविवार): अंतिम सामना – कोलंबो किंवा बेंगळुरू