सध्याच्या घडीला जगातील महान फुटबॉलर म्हटलं तर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनल मेस्सी (Lional Messi) या दोघांची नाव डोळ्यासमोर येतात. फुटबॉलच्या मैदानावर या दोघांमधील स्पर्धा चाहत्यांना फार रोमांचित करते. मात्र खाजगी आयुष्यात या दोघांमध्ये आजतागायत कोणताही वाद समोर आला नाही. नुकतेच रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ( Georgina Rodríguez) हिच्या फोटोवर मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझोस (Antonela Roccuzzos) हिने केलेली एक कमेंट प्रचंड व्हायरल होत आहे.
जॉर्जिनाने जीममध्ये व्यायाम करतानाचा एक फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या असताना मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझोस हिनेही फायर इमोजी (?) पेस्ट करत जॉर्जिनाच्या फोटोची एकप्रकारे स्तुती केली आहे. दरम्यान हीच कमेंट व्हायरल होत असून बातमी अपडेट होईपर्यंत ८०० हून अधिक जणांनी ही कमेंट लाईक केली आहे. इतर कोणत्याही कमेंटच्या तुलनेत या कमेंटला सर्वाधिक लाईक्स आले आहेत. त्यामुळे या कमेंटकडे आपसूकच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.