फोटो सौजन्य: @MotorsportSkoda/X.com
भारतीय ऑटो मार्केट म्हणजे व्यापाराची एक मोठी संधी. याच संधीचे सोनं करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक विदेशी ऑटो कंपनीनं म्हणजे Skoda. देशातील ऑटो बाजारात स्कोडाने उत्तम डिझाइन आणि फीचर्स असणाऱ्या कार लाँच केल्या आहेत.
स्कोडा देशात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. आता लवकरच कंपनी भारतात Skoda Octavia RS ही नवी कार लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी याची प्री-बुकिंग सुरू उद्यापासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून सुरु होईल. ही कार कधी लाँच केले जाईल त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?
स्कोडाकडून घोषणा करण्यात आली आहे की कंपनी लवकरच भारतात Skoda Octavia RS लाँच करणार आहे. यासाठीची प्री-बुकिंग उद्यापासून सुरू होईल. ग्राहकांना ही कार ऑनलाइन आणि डीलरशिपमार्फत बुक करता येणार आहे.
निर्मात्याच्या माहितीनुसार, या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले जाणार आहेत. फुल ब्लॅक इंटीरियरसोबत रेड इंसर्ट्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला प्रीमियम लुक मिळतो. तसेच यात RS बॅजिंगसह स्पोर्ट्स कार सीट्स, कार्बन फायबर फिनिश, 13-इंच सेंट्रल डिस्प्ले आणि नेव्हिगेशन सिस्टम हे स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आले आहेत.
याशिवाय, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट सीट्स, मेमरी फंक्शनसह सीट कुशन, 10-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅल्युमिनियम फिनिश पेडल्स, LED मॅट्रिक्स हेडलाइट्स, 18 व 19-इंच अलॉय व्हील्स, रिअर LED लाइट्स आणि अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्सही दिली जातील. या सर्व फीचर्ससह Skoda Octavia RS भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
स्कोडा Octavia RS ला सामान्य ऑक्टाव्हियाच्या तुलनेत अधिक पॉवरफुल इंजिनसह सादर करणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये यात 2.0-लीटर TSI इंजिन दिले जाते, जे 265 हॉर्सपॉवर आणि 370 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही पॉवर जुन्या व्हर्जनपेक्षा 15 किलोवॅटने जास्त आहे.
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
कारमध्ये 7-स्पीड DSG ट्रान्समिशन देण्यात आले असून, हे इंजिन कारला फक्त 6.4 सेकंदांत 0 ते 100 किमी/ता स्पीड पकडण्याची क्षमता देते. याचा टॉप स्पीड 250 किमी/ता इतका आहे.
स्कोडा कंपनीने 17 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात त्यांची नवीन कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही कार FBU म्हणून दिली जाईल, म्हणूनच ती मर्यादित संख्येत विकली जाण्याची शक्यता आहे.