Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाने जागतिक स्तरावर भारताच्या आणि स्वतःच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 09:47 PM
जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव
Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाने रचला नवा रेकॉर्ड
पाकिस्तानविरुद्ध स्मृतीने केली ६८ रन्सची खेळी 
१०० प्रभावशाली खेळाडूंमध्ये सामील झाले स्मृतीचे नाव

Smriti Mandhana: सध्या आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला आहे. भारताच्या विजयात स्मृती मंधानाचे मोठे योगदान राहिले आहे. संघ अडचणीत सापडला असताना स्मृतीने ६८ रन्सची शानदार खेळी केली. उद्या भारतीय संघ नेदरलँड्स विरुद्ध सामना खेळणार आहे. त्याआधी स्मृती आणि भारतीय क्रिकेटसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाने जागतिक स्तरावर भारताच्या आणि स्वतःच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. प्रसिद्ध टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील १०० प्रभावशाली खेळाडूंमध्ये स्मृती मंधानाला स्थान मिळाले आहे. या संपूर्ण यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

IND W vs PAK W: स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान! पाकिस्ताविरुद्ध केली आजवरची सर्वात मोठी पार्टनरशिप

‘टाइम’ने जाहीर केलेल्या २०२६ च्या यादीमध्ये क्रीडापटू, प्रशिक्षक आणि गुंतवणूकदार यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी आपल्या क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचे आणि मोठे प्रभावशाली काम केले आहे, त्यांचे नाव या यादीत पाहायला मिळत आहे.या यादीमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, बास्केटबॉल लेजेंड लेब्रोन जेम्स यांचा देखील समावेश आहे. यावरून स्मृती मंधानाने मिळवलेले हे यश किती मोठे आहे हे लक्षात येते.

स्मृती मंधाना सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधार पद भूषवत आहे. सध्याच्या घडीला स्मृती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती आरसीबीचे नेतृत्व करत आहे. तिने उमटवलेला ठसा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिचे सातत्यपूर्ण प्रदर्शन यामुळेच तिची निवड ‘टाईम’ने या यादीत केली आहे.

Team India: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने; वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा

स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या १८ धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी आली आणि तिने स्मृती मानधनासोबत डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची शानदार भागीदारी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. टी-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारताची ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या होत्या.

 

Web Title: Time magazine name listed smriti mandhana name 100 most best sportsperson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Smriti Maandhana
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

The Making of a Cricketer: लोकांनी चेहऱ्यावरून ‘पुरुष’ हिणवलं पण…; वाचा ‘टीम इंडिया’च्या Bharti Fulmali ची कहाणी
1

The Making of a Cricketer: लोकांनी चेहऱ्यावरून ‘पुरुष’ हिणवलं पण…; वाचा ‘टीम इंडिया’च्या Bharti Fulmali ची कहाणी

Deepti Sharma: दे घुमाके! दीप्ती शर्माच्या निशाण्यावर ‘तो’ रेकॉर्ड, केवळ २ विकेट्स अन्…
2

Deepti Sharma: दे घुमाके! दीप्ती शर्माच्या निशाण्यावर ‘तो’ रेकॉर्ड, केवळ २ विकेट्स अन्…

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी
3

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

IND W Vs PAK W: ‘मी नुकतेच विमानातून…’; भारताच्या विजयावर Sachin Tendulkar ची खास पोस्ट
4

IND W Vs PAK W: ‘मी नुकतेच विमानातून…’; भारताच्या विजयावर Sachin Tendulkar ची खास पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.