
काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?
भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे मजबूत दिसून येत आहे. टी 20 वर्डकपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये 3 वेळेस आमनेसामने आले आहेत. तीनही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसून येत आहे.
मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उद्याचा सामना भारतीय संघाला उद्याचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यंत रोमांचक होण्याचा अंदाज आहे.
Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड
Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी
सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे.
बाप रे, काय ते पदार्पण! Shree Charani ने पाकिस्तानला पाणी पाजलं; T20 वर्ल्ड कपमध्ये केला महारेकॉर्ड
कालच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताची फिरकीपटू श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. तिने कालच्या सामन्यात 24 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या. त्यामुळे भारताचा पराभव झाला असला तरी हा सामना शेवटपर्यन्त नेण्यात भारतीय संघाला यश आले. दरम्यान तीन सामन्यात श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.