Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! अभिषेक – ट्रॅव्हिस हेडची जोडी तुटली; काय आहे कारण

IPL 2027: २०२७ मधील व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे ट्रॅव्हिस हेडने आगामी आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही स्फोटक सलामीची जोडी यावेळी नाही.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 17, 2026 | 03:17 PM
ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मधून बाहेर (फोटो सौजन्य - Instagram)

ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ मधून बाहेर (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • आयपीएल २०२७ मध्ये Travishek दिसणार नाही
  • या जोडीने ४२ डावांमध्ये प्रति षटक १२.२७ धावांच्या विक्रमी सरासरीने एकूण १,८९२ धावा केल्या होत्या
  • Travis Head ने दिला धक्का 
IPL 2027: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात धोकादायक सलामीची जोडी तुटली आहे. पुढील हंगामात, अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादसाठी एका नवीन फलंदाजासोबत डावाची सुरुवात करेल, कारण ट्रॅव्हिस हेडने त्याच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आयपीएल २०२७ मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हेडने कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) हे कारण देत, आयपीएल रिटेन्शन डेडलाइनच्या अगदी आधी फ्रँचायझीला या निर्णयाची माहिती दिली.

India Record: 58 वर्षात 25 कसोटी सामने अन् केवळ 5 मध्ये यश, न्यूझीलंडमध्ये भयानक आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड

SRH मोठ्या रकमेसह लिलावात उतरणार

याचा अर्थ असा की, सनरायझर्स हैदराबाद आता १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या मिनी लिलावात मोठ्या रकमेसह उतरणार आहे. हेड एसआरएचसाठी १४ कोटी रुपये (१४० दशलक्ष रुपये) पगारावर खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड हा त्या पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक होता, ज्यांना फ्रँचायझीने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसण्याची शक्यता

या वर्षी ऑगस्टमध्ये, ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी संकेत दिले होते की, ऑस्ट्रेलियाला २०२७ मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागेल, ज्यामुळे त्यांना काही निर्णय घ्यावे लागतील. २० सामन्यांच्या व्यस्त कसोटी वेळापत्रकाव्यतिरिक्त, मॅकडोनाल्ड यांनी काही महत्त्वाच्या सामन्यांचा उल्लेख केला: आयपीएलनंतर लगेचच जूनमध्ये होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, त्यानंतर ॲशेस मालिका (जून-ऑगस्ट) आणि मग एकदिवसीय विश्वचषक (ऑक्टोबर-नोव्हेंबर). या सगळ्या खेळांमुळे ट्रॅव्हिसला खेळणं शक्य होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. IPL पेक्षा देशासाठी खेळणं नक्कीच ट्रॅव्हिसने निवडलं आहे जे कौतुकास्पद म्हणता येईल. 

मालकीण काव्याचे नुकतेच झाले लग्न 

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचे नुकतेच लग्न झाले आहे. संगीतकार अनिरुद्धसह ती लग्नबंधनात अडकली असून आता मिनी ऑक्शनसाठी काव्या नक्की कोणाला निवडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ट्रॅव्हिस हेडची माघार हे नक्कीच संघासाठी मोठं नुकसान आहे. कारण अभिषेकसह ट्रॅव्हिस ही जोडी कायम आयपीएलमध्ये कमालीची कामगिरी करणारी ठरली आहे. 

IND vs NZ: शुभमनने केलं चित्र स्पष्ट! कसोटीच्या पहिल्या सामन्यात बुमराह-आकाशदीप खेळणार, सुदर्शन-सिराज OUT

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२७ का खेळणार नाही?

    Ans: व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि कामाच्या ताणाचे व्यवस्थापन यामुळे ट्रॅव्हिस हेडने आयपीएल २०२७ हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Que: आयपीएल २०२७ च्या मिनी-लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादची काय तयारी आहे?

    Ans: ट्रॅव्हिस हेडच्या जाण्यामुळे फ्रँचायझीकडे महत्त्वपूर्ण आर्थिक पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आगामी मिनी-लिलावात मोठ्या रकमेसह प्रवेश करेल.

  • Que: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने ट्रॅव्हिस हेडला कोणत्या किमतीत कायम ठेवले?

    Ans: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने ट्रॅव्हिस हेडला ₹१४ कोटींच्या पगारावर कायम ठेवले.

Web Title: Travis head will not play ipl 2027 ahead of mini auction took decision big shock for sunrisers hyderabad dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • IPL 2027
  • Sunrisers Hyderabad
  • Travis Head

संबंधित बातम्या

IPL 2027: वादाला आमंत्रण! यावर्षी चक्क बांगलादेशचे ७ खेळाडू लिलावात; कहर म्हणजे मुस्तफिजुरही सहभागी
1

IPL 2027: वादाला आमंत्रण! यावर्षी चक्क बांगलादेशचे ७ खेळाडू लिलावात; कहर म्हणजे मुस्तफिजुरही सहभागी

IPL 2027: अखेर सस्पेन्स संपला! Hardik Pandya पंजाबच्या ताफ्यात, तर Arshdeep ची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; किती कोटींची डील?
2

IPL 2027: अखेर सस्पेन्स संपला! Hardik Pandya पंजाबच्या ताफ्यात, तर Arshdeep ची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; किती कोटींची डील?

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
3

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.