
7 बांगलादेशी खेळाडूंनी केली लिलावासाठी नोंदणी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आगामी आयपीएल हंगामासाठी १६ डिसेंबर रोजी एक छोटा लिलाव होणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डासह विविध क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुस्तफिजुर रहमानच्या नावावरून निर्माण झालेला वाद अवघ्या १० महिन्यांपूर्वीच निर्माण झाला होता, आणि आता BCCI पुन्हा एकदा बांगलादेशी क्रिकेटपटूंना लिलावात आणत आहे.
७ बांग्लादेशी खेळाडूंनी केली लिलावासाठी नोंदणी
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ७ बांग्लादेशी खेळाडूंनी मिनी-लिलावासाठी आपली नावे सादर केली आहेत. यामध्ये मुस्तफिजुर रहमानचा समावेश आहे. नाहिद राणा, रिशाद होसेन, हसन महमूद, तौहिद हृदोय, तस्किन अहमद आणि शोरिफुल इस्लाम यांचाही या यादीत समावेश आहे.
मात्र, आयपीएलने अद्याप लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. त्यापूर्वी, सर्व १० संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंना मुक्त करतील. त्यांच्या संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंचाही लिलावात समावेश केला जाईल. त्यामुळे, लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी अद्याप प्रलंबित आहे.
बांग्लादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकला
मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्याच्या निर्णयाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून विरोध झाला. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताने केले होते. बांगलादेशने स्पर्धेसाठी तटस्थ स्थळाची विनंती केली होती, परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. यानंतर, बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली. यामुळे भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेटचे संबंधही बिघडले. मात्र आता या सहभागानंतर कोणती टीम या खेळाडूंना विकत घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
Ans: IPL 2027 चा मिनी-लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यात होणार आहे
Ans: या मिनी लिलावासाठी बांगलादेशच्या ७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे
Ans: नाहिद राणा, रिशाद होसेन, हसन महमूद, तौहिद हृदोय, तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमानचा समावेश आहे