
Hardik Pandya traded to Punjab Arshdeep joins MI
हार्दिक पांड्या गेल्या काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा सदस्य असून त्याने संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. आता, आयपीएल २०२७ च्या आधी त्याचे पंजाब किंग्समध्ये सामील होणे, हा फ्रँचायझीसाठी एक महत्त्वपूर्ण बदल आहे. पंजाब किंग्सने त्याला १८ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे, म्हणजेच हार्दिकला त्याच्या सध्याच्या मानधनापेक्षा १.६५ कोटी रुपये अधिक मिळतील. आपल्या फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीसोबतच, हार्दिक पंजाबसाठी कर्णधारपदाचा अनुभवही घेऊन येईल. त्याच्या उपस्थितीमुळे संघाची मधली फळी आणि अष्टपैलू विभाग अधिक मजबूत होऊ शकतो.हार्दिकने १६२ आयपीएल सामन्यांमध्ये २,९५५ धावा केल्या आहेत आणि ८२ विकेट्स घेतले आहेत.
हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा दुसरा कार्यकाळ संपला आहे. तो पहिल्यांदा २०१५ मध्ये या फ्रँचायझीमध्ये सामील झाला होता. मुंबईसोबत त्याने २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये चार आयपीएल विजेतेपदे जिंकली. मुंबईत सात हंगाम घालवल्यानंतर, तो २०२२ मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि आपल्या पहिल्याच हंगामात संघाला चॅम्पियन बनवले. गुजरातने २०२३ मध्ये फायनलसामनाही खेळला होता. यानंतर, हार्दिक २०२४ मध्ये मुंबईत परतला आणि त्याने संघाचे कर्णधारपद स्वीकारले.
मुंबई इंडियन्सने अर्शदिप सिंगला करारबद्ध केले आहे. अर्शदीप त्याच्या सध्याच्या १८ कोटी रुपयांच्या मानधनासोबत मुंबईच्या पलटनमध्ये सामील होणार आहे. अर्शदीप हा भारतातील आघाडीच्या टी-२० गोलंदाजांपैकी एक आहे. अर्शदीप आठ हंगामांसाठी पंजाब संघाचा भाग होता. त्याने २०१९ मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्शदीपने ९६ सामन्यांमध्ये १११ विकेट्स घेऊन तो पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. अर्शदिप नवीन चेंडू स्विंग करण्यासाठी आणि डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यासाठी ओळखला जातो. तो पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे टी-२० क्रिकेटमधील त्याचा अनुभव मुंबईसाठी फायदेशीर ठरू शकतो.
The trade confirmation you have been waiting for is HERE! Two marquee #TeamIndia stars, two franchise and a blockbuster trade 🎇 Hardik Pandya heads to @PunjabKingsIPL and Arshdeep Singh moves to @mipaltan. 📌 Hardik will join #PBKS at a revised fee of INR 18 crore, up from… pic.twitter.com/LMcYMjnScF — IndianPremierLeague (@IPL) November 11, 2026
या ट्रेडमुळे पंजाब किंग्सला एक अनुभवी भारतीय अष्टपैलू आणि कर्णधारपदाचा अनुभव असलेला खेळाडू मिळाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने भारतीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक अर्शदीप सिंगला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर हा ट्रेड चर्चेत आहे, कारण यामध्ये दोन प्रमुख भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
Ans: आयपीएल २०२७ मध्ये हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार.
Ans: अर्शदीप सिंग १८ कोटी रुपयांच्या सध्याच्या मानधनासह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे.
Ans: हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सने १८ कोटी रुपयांच्या करारासह आपल्या संघात सामील केले आहे.