
ENG vs PAK: राव कसला हा खेळ! चक्क बॉलच फोडला; जोश टंग अन् रॉबिन्सनने कसा केला पाकिस्तानचा गेम ओव्हर…
जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेली भारतीय महिला दुहेरी जोडी त्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या जिया यी फॅन आणि झांग शू जियान यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्रिसा-गायत्रीने जिया आणि जियान यांचा १६-२१, २१-१५, २१-१३ असा पराभव केला. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिला गेम १६-२१ ने गमावला. मात्र, त्यांनी दमदार कमबॅक करत दुसरा गेम २१-१५ ने जिंकला. जबरदस्त कामगिरी कायम ठेवत त्यांनी तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये २१-१३ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरी प्रकारात किमान एक पदक निश्चित केले आहे.
त्रिसा आणि गायत्री यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या जोडीने पदक मिळवण्याची ही १५ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी लंडन येथील स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते.
त्रिसा आणि गायत्री २०२२ आणि २०२३ मध्ये ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या होत्या. त्यांनी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही जिंकले होते आणि गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते.
Long wait for medal over! 👏🇮🇳#BWFWorldChampionships #NewDelhi2026 pic.twitter.com/VIEtHH9Uz1 — BWF (@bwfmedia) August 21, 2026
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीची जोडी देखील भारतासाठी आणखी एका पदकाच्या शर्यतीत आहे. पाचवे मानांकन असलेली ही भारतीय जोडी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकन असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीशी सामना करेल. जर सात्विक आणि चिरागने हा सामना जिंकला, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे दुसरे पदक निश्चित होईल.
WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?