WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
हेडिंग्ले येथे इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १७१ धावांवर सर्वबाद झाला. ऑली रॉबिन्सनने १८ षटकांत ५१ धावा देऊन ५ विकट्स घेतले. जोश टंगनेही ९.१ षटकांत ४६ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखले.
जेव्हा एखादा खेळाडू फिफर म्हणजेच पाच विकेट्स घेतो, तेव्हा तो चेंडू स्वतःकडे ठेवतो. एका डावात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेणे क्वचितच घजचे. म्हणूनच जेव्हा रॉबिन्सन आणि टंग यांनी हा पराक्रम केला, तेव्हा त्यांनी एक अनोखा निर्णय घेतला. त्यांनी चेंडूचे दोन तुकडे करून तो स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले. क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, पाच विकेट्स घेणाऱ्या दोन गोलंदाजांनी चेंडू अर्धा कापून तो आपापसात वाटून घेतला.
Josh Tongue and Ollie Robinson have had the ball split in half so they can both have a momento from their five-wicket hauls 🏴🏏 Brilliant picture by @dudleyplatypus 📸#ENGvPAK pic.twitter.com/a5yUZIvuMx — England’s Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) August 19, 2026
इंग्लंड क्रिकेटने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ऑली रॉबिन्सन आणि टंग यांनी चेंडूचे दोन तुकडे केल्यानंतर आपले मत मांडले आहे. टंगने स्पष्ट केले की, ही कल्पना त्याला ऑलीने दिली होती आणि त्याने पहिल्यांदा अशी गोष्ट स्वतः च्या डोळ्यांनी पाहिली. रॉबिन्सनने सांगितले की, टीम मॅनेजर वेन बेंटलीने पाच मिनिटांत चेंडूचे दोन तुकडे केले. आणि हा क्षण तो कधीही विसरणार नाही.
टंग आणि रॉबिन्सन आता इंग्लंडसाठी एकाच कसोटी डावात पाच विकेट्स घेत इतिहास रचला आहे. २८ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारी ही पहिली इंग्लिश वेगवान गोलंदाजांची जोडी ठरली आहे. यापूर्वीचा विक्रम १९९८ मध्ये अँडी कॅडिक आणि अँगुस फ्रेझर यांनी केला होता. त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेतले होते.
टॉम रिचर्डसन आणि जॅक हर्न यांनी १८९६ मध्ये लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेऊन हा पराक्रम केला होता. इंग्लंडच्या दोन गोलंदाजांनी एकाच डावात पाच विकेट्स घेण्याची पहिली वेळ १८८८ मध्ये होती, जेव्हा जॉर्ज लोहमन आणि बॉबी पील यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.






