
Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल
Badminton Tournament : बॉम्बे जिमखाना प्रस्तुत योनेक्स सनराइज बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये मुंबई उपनगरच्या स्पृहा जोशीने अव्वल मानांकित युविका बजाजला पराभूत करत मुलींच्या 19 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे, ग्रेटर मुंबईच्या हर्षित महिमकरने पुरुष एकेरी आणि मुलांच्या 19 वर्षांखालील एकेरी अशा दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत धडक मारत दुहेरी विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या.
स्पृहा जोशीने उपांत्य फेरीत शानदार खेळ करत अव्वल मानांकित युविका बजाजला 9-15, 20-18, 15-9 असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर स्पृहाने दुसऱ्या गेममध्ये महत्त्वाचे गुण वाचवत 20-18 अशी बाजी मारली. निर्णायक गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला संधी न देता विजय मिळवला.
अंतिम फेरीत स्पृहाचा सामना ग्रेटर मुंबईच्या अन्विशा घोरपडे हिच्याशी होणार आहे. अन्विशाने पुण्याच्या शर्वरी वारवंटकरला 15-11, 15-10 असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
हर्षित महिमकरने मुलांच्या 19 वर्षांखालील एकेरीच्या उपांत्य फेरीत इशान वानखेडेचा 15-13, 15-10 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष एकेरीत अव्वल मानांकित विनय पाटीलला 11-15, 16-14, 15-3 असे नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या गेममध्ये महत्त्वाच्या क्षणी विजय मिळवत हर्षितने सामन्यात पुनरागमन केले आणि निर्णायक गेममध्ये एकतर्फी विजय नोंदवला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत वेद भोईरने निशांत गलांडेचा 15-3, 15-11 असा पराभव केला. त्यामुळे अंतिम फेरीत हर्षित महिमकर आणि वेद भोईर यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’
मुलांच्या 17 वर्षांखालील दुहेरीत अव्वल मानांकित आदित्य पडवळ आणि आर्यन नायर या ठाण्याच्या जोडीला चंद्रांशू गुंडले आणि मयंक राजपूत यांच्या जोडीने कडवी झुंज दिली. अखेर आदित्य आणि आर्यन यांनी 15-13, 8-15, 17-15 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या 17 वर्षांखालील एकेरीत इमान मोटरवाला आणि अन्विशा घोरपडे यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. मुलांच्या 17 वर्षांखालील एकेरीत अक्षत रायसुराणा आणि ध्रुव पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
मुलींच्या 17 वर्षांखालील दुहेरीत धन्वी नायर-सान्वी माळी आणि इमान मोटरवाला-रुद्रा गावडे या जोड्या विजयी ठरल्या. मुलींच्या 19 वर्षांखालील दुहेरीत खुशी पहवा-युविका बजाज आणि प्रांजल देढिया-सायशा नाईक यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या 19 वर्षांखालील दुहेरीत निधिश मोरे-यश ढेंबरे आणि डिऑन गोन्साल्विस-ऋतुराज चिपट यांनी विजय मिळवला. महिला एकेरीत श्रेया राठोड आणि वंशिका तुलसानी यांनी, तर पुरुष दुहेरीत निधिश मोरे-विनय पाटील आणि विप्लव कुवळे-विराज कुवळे यांनी अंतिम फेरी गाठली. मिश्र दुहेरीत सोहम फाटक-सिया सिंग आणि कृष्णा मजेठिया-अर्पणा बने या जोड्या विजयी ठरल्या.
Ans: स्पृहा जोशीने मुलींच्या 19 वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित युविका बजाजचा 9-15, 20-18, 15-9 असा पराभव केला.
Ans: स्पृहा जोशीचा अंतिम फेरीत ग्रेटर मुंबईच्या अन्विशा घोरपडे हिच्याशी सामना होणार आहे.
Ans: हर्षित महिमकरने पुरुष एकेरी आणि मुलांच्या 19 वर्षांखालील एकेरी या दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.