
फोटो सौजन्य - Sony Sports Network
Abhigyan Kundu scored a double century : U19 आशिया कप 2025 ची स्पर्धा सुरु झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कमालीची कामगिरी आतापर्यत पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेचा भारताचा सध्या शेवटचा लीग सामना सुरु आहे. ही स्पर्धा भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेसाठी फार काही चांगली झाली नाही. संघाने चांगली कामगिरी केली आहे पण या तीनही सामन्यामध्ये आयुष म्हात्रे हा फार काही धावा करु शकला नाही. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 400 हून अधिक धावा केल्या.
भारत आणि मलेशिया या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करुन ७ विकेट्स गमावल्यानंतर 408 धावा केल्या आहेत. या सामन्यामध्ये मलेशियाला सामना जिंकायचा असल्यास त्यांना 409 धावा कराव्या लागणार आहेत. भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये वेदांत त्रिवेदी हा त्याच्या शतक पुर्ण करण्यापासून 10 धावांनी हुकला पण या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू अभिज्ञान कुंडू याने द्विशतक झळकावले आहे. त्याने भारतीय संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि नाबाद राहिला. त्याच्या या खेळीने भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले.
🚨 DOUBLE HUNDRED FOR 17-YEAR OLD ABHIGYAN KUNDU 🚨 Abhigyan Kundu smashed a Marvelous double Hundred in just 121 balls against Malaysia in U19 Asia Cup. – Abhigyan Kundu, The Future! 🙌 pic.twitter.com/W3b53nhx0F — Tanuj (@ImTanujSingh) December 16, 2025
अभिज्ञान कुंडू याने त्याचे द्विशतक 121 चेंडूमध्ये पुर्ण केले यामध्ये त्याने 9 षटकार आणि 16 चौकार मारले आणि भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले आहे. १७ वर्षीय या खेळाडूने मलेशियाविरुद्ध द्विशतक झळकावले. या स्पर्धेत कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे आणि कुंडूने त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक झळकावले. अभिज्ञानने केवळ १२१ चेंडूत २५ षटकार आणि चौकार मारत आपले द्विशतक पूर्ण केले. अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकाबद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तो पाचव्या क्रमांकावर खेळताना द्विशतक झळकावू शकला.
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर कुंडू क्रीजवर आला आणि लगेचच स्फोटक फटके खेळू लागला. डावखुरा फलंदाज फक्त ४४ चेंडूत त्याचे अर्धशतक आणि नंतर पुढील ३६ धावांत त्याचे शतक पूर्ण केले. कुंडू एवढ्यावरच थांबला नाही, त्याने फक्त १२१ चेंडूत षटकार आणि चौकारांची भरारी मारत द्विशतक पूर्ण केले. त्याने एका षटकारासह त्याचे द्विशतक पूर्ण केले. या खेळाडूने ९ षटकार आणि १६ चौकारांसह आपले द्विशतक पूर्ण केले.