Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघासमोर ४१२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 07:18 PM
 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर
Follow Us
Follow Us:

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात विश्वविजेतेपदासाठी लढत सुरू आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावून ४११ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंड संघाला विजयासाठी ४१२ धावा कराव्या लागणार आहे. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा U19 World Cup Final मध्ये रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला विश्वातील पहिलाच फलंदाज

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली. वैभव आणि म्हात्रे या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स ग्रीनने बाद केले.

त्यानंतर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार लगावले. शतकानंतर वैभव सूर्यवंशी अधिक घातक बनला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो दुहेरी शतक लगावेल असे वाटत असतानाच तो १७५ धावांवर बाद झाला. त्याने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. तो पर्यंत वैभव आणि वेदांत त्रिवेदी  या दोघांनी ८९ धावांची भागीदारी रचली. वैभवला त्याला मॅनी लुम्सडेनने बाद केले. तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहचवले होते.

वैभव सूर्यवंशी बाद झाल्यावर भारताची धावगती संथ  झालेली दिसून आली. वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला. वेदांत ३२ धावा करून बाद झाला. तर विहान मल्होत्रा ३० धावा करून माघारी गेला. त्यानंतर अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले आणि तो बाद झाला. तसेच अबरीश १८ धावा करून बाद झाला. खिलन पटेल ३ धावा तर हेनिल पटेल ५ धावा करून माघारी परतले. तर दुसऱ्या बाजूने कनिष्क चौहान २० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या  मदतीने ३७ धावा करून नाबाद राहिला आणि संघाची धाव संख्या ४०० पार पोहचवली. दीपेश देवेंद्रन ० धावा काढून नाबाद राहिला. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, अॅलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लुम्सडेनने १ विकेट घेतली.

हेही वाचा : WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन

भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

 

Web Title: U19 world cup final live in the final match india sets a target of 412 runs against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • IND Vs ENG
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
1

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
2

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
3

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.