UAE team announced for T20 tri-series! 'This' team will clash before Asia Cup 2025
UAE squad announced for T20 tri-series : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी, यूएई, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० तिरंगी मालिका रंगणार आहे. ही टी-२० मालिका २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी यूएईने आपला संघ जाहीर केला आहे. मोहम्मद वसीम हा संघाचा कर्णधार असणार आहे. तथापि, आशिया कपसाठी यूएई संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
९ सप्टेंबरपासून यूएईमध्येच पुरुषांच्या टी-२० आशिया कप होणार आहे. त्या दृष्टीने तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. यूएईच्या संघात चार नवीन खेळाडूंनया स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद फारूख आणि मुहम्मद जवादुल्लाह यांना संधि देण्यात आली आहे. त्याच वेळी, आकिफ राजा, मतियुल्लाह खान आणि झुहैब झुबैर यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे.
हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या रडारवर ‘हा’ मोठा विक्रम! Duleep Trophy मध्ये ‘ही’ कामगिरी करताच रचणार इतिहास
यूएईच्या संघातील मुख्य खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला गेला नाही. संघात अलिशान शराफू, आर्यनश शर्मा आणि राहुल चोप्रा सारखे अनुभवी खेळाडूंचा भरणा असून यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. पर्ल ऑफ आफ्रिका कपमध्ये यूएईकडून सर्वोत्तम कामगिरी करणारे फलंदाज मुहम्मद जोहैब आणि सगीर खान हे पुन्हा एकदा संघाच्या प्रमुख योजनांचा भाग असणार आहे.
यूएईचा पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तानसोबत खेळवण्यात येणार आहे. त्याच वेळी, दुसरा सामना १ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानसोबत होणार आहे. ४ सप्टेंबर रोजी यूएई पाकिस्तानच्या संघाशी दोन हात करणार आहे. तर यूएई संघ शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानशी होणार आहे. सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. त्याच वेळी, रशीद खान या स्पर्धेत अफगाणिस्तान संघाची धुरा संभाळणार आहे. तर पाकिस्तान संघाचे नेतृत्व सलमान अली आगा यांच्याकडे असणार आहे.
हेही वाचा : ‘सुदैवाने ते लवकर आढळले’, कर्करोगाशी यशस्वी झुंज देणाऱ्या मायकेल क्लार्कचे विधान चर्चेत..
मुहम्मद वसीम (कर्णधार), आलिशान शराफू, आर्यांश शर्मा (यष्टीरक्षक), आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सागिर खान.