मायकेल क्लार्क(फोटो-सोशल मीडिया)
Michael Clarke on his Skin Cancer : ऑस्ट्रेलियाचा माजी यशस्वी कर्णधार मायकेल क्लार्क सध्या चर्चेत आला आहे. तो आता त्वचेच्या कर्करोगाच्या जागरूकतेबद्दल एक पोस्ट शेअर केल्यामुळे तो आता चर्चेत आला आहे. मायकेल क्लार्क हा त्वचेच्या कर्करोसही झुंज देत होता. त्यानंतर त्याने नुकतेच त्यासाठीची एक शस्त्रक्रिया देखील करून घेतली आहे. त्याच वेळी, त्याने आता सोशल मीडियाद्वारे सामान्य लोकांशी संवाद साधून या आजाराबाबत सतर्क राहण्याचे संगीतेला आहे.
हेही वाचा : ICC ODI Ranking मध्ये भारताचा डंका! टॉप-५ मध्ये शुभमन गिलसह ‘या’ दोन खेळाडूंचा समावेश
मायकेल क्लार्कने फेसबुकवर एक पोस्ट करताना त्याच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्याने या पोस्टद्वारे लोकांना कर्करोगाबद्दल जागरूक राहण्याचा संदेश देखील दिला आहे. क्लार्कने लिहिले आहे की, “ऑस्ट्रेलियामध्ये त्वचेचा कर्करोग हे एक वास्तव आहे. तुमच्या त्वचेची तपासणी करा. हा माझा एक मैत्रीपूर्ण सल्ला आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे, परंतु माझ्या बाबतीत, नियमित तपासणी आणि लवकर निदान महत्वाचे आहे. सुदैवाने ते लवकर आढळले.”असे त्याने लिहिले आहे.
मायकेल क्लार्ककडून एक फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्याच्या नाकावर एक पट्टी लावलेली दिसत आहे. हे त्याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार राहिलेल्या क्लार्कला २००६ मध्ये त्याच्या या त्वचेच्या कर्करोगाबद्दल माहिती झाली. तेव्हापासून तो बरा होत आहे. आतापर्यंत त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. क्लार्कला चेहरा आणि कपाळाचा त्वचेचा कर्करोग झाला होता. आता तो या अजातून पूर्णपणे ठीक झाला आहे.
क्लार्क सध्या या आजाराबद्दल लोकांना या जागरूक करण्याचे काम करत आहे. २०१० मध्ये तो कर्करोग परिषदेचा राजदूत देखील बनला होता. क्लार्क म्हणाला की, त्वचेचा कर्करोग हा जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्याने होत असून कसोटी सामन्यांदरम्यान खेळाडूंना बराच वेळ मैदानात सूर्यप्रकाशाखाली राहावे लागते. याचा त्वचेवर सूर्यप्रकाशाचा जास्त परिणाम होत असतो. सूर्यप्रकाशापासून चेहऱ्याची सुरक्षितता राखण्याची गरज आहे.
हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या रडारवर ‘हा’ मोठा विक्रम! Duleep Trophy मध्ये ‘ही’ कामगिरी करताच रचणार इतिहास
ऑस्ट्रेलियाचा ४४ वर्षीय माजी कर्णधार मायकेल क्लार्क हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि कर्णधार राहिला आहे. क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१५ चा एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. याच वर्षी क्लार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून ११५ कसोटी सामन्यांमध्ये २८ शतकांसह ८,६४३ धावा, २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ७,९८१ धावा केल्या आहेत. तसेच ३४ टी-२० सामन्यांमध्ये ४८८ धावा केल्या आहेत.