Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ CT Final 2025: 12 वर्षांचा दुष्काळ संपला; भारताने ‘किवीं’ना नमवत कोरले Champions Trophy वर नाव

India to win Champions Trophy 2025 : भारताच्या संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आठ महिन्यांमध्ये दुसरे आयसीसी टायटल नावावर केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 09, 2025 | 09:59 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

Team India won the Champions Trophy title : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना झाला आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्वतः फलंदाजीची जबाबदारी घेऊन न्यूझीलँडच्याय्या फलंदाजांना पहिल्या ओव्हरपासून झोडपायला सुरुवात केली होती. तर शुभमन गिलने दुसऱ्या बाजूने खेळ सांभाळला. भारताच्या संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आठ महिन्यांमध्ये दुसरे आयसीसी टायटल नावावर केले आहे. रोहित शर्मा हा जगातला सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याने नाव कोरले आहे.

IND vs NZ Final : युजवेंद्र चहल पुन्हा एकदा प्रेमात? मिस्ट्री गर्लचा हात हातात घेऊन दिसला फायनल सामना बघताना…

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा १५ वा नाणेफेकमध्ये पराभव झाला. पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने ७ विकेट्स गमावत २५२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये न्यूझीलंडच्या संघासाठी डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी दोघांनी अर्धशतकीय खेळी खेळली होती. मायकेल ब्रेसवेल याने संघासाठी ५३ धावांची नाबाद खेळी खेळली. तर डॅरिल मिशेल याने संघासाठी ६३ धावा केल्या.

भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीने कमालीची गोलंदाजी करून २ विकेट्स भारतीय संघाला मिळवून दिले. तर कुलदीप यादवने भारताच्या संघाला न्यूझीलंडच्या दोन मजबूत फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात दोन विकेट्स घेतले. कुलदीप यादवने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन याना बाहेर केले आणि सामना भारताच्या दिशेने वळवला. रवींद्र जडेजाने संघासाठी एक विकेट घेतला तर मोहम्मद शमीने सर्वाधिक धावा दिल्या आणि १ विकेट भारताच्या नावावर केला.

टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची ,महत्वाची खेळी खेळून टीम इंडियाला मजबूत सुरुवात करून दिली आणि चांगल्या स्थितीत उभे केले. भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने संघासाठी ३१ धावांची महत्वाची खेळी खेळून महत्वाचे योगदान दिले. त्यानंतर दोन्ही विकेट गमावल्यानंतर भारताचा स्टार एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाज श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा टीम इंडियाचा खेळ सांभाळला आणि भारताच्या संघासाठी महत्वाची ४८ धावांची खेळी खेळली.

Web Title: Under the leadership of rohit sharma the indian team won the champions trophy 2025 title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • India Vs New Zealand
  • Team India

संबंधित बातम्या

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
1

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
2

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले
3

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?
4

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.