
Asian Para Games 2026
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वाती चौधरीचे कौतुक केले असून तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या W1 तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल उत्तर प्रदेशची कन्या स्वाती चौधरीचे मन:पूर्वक अभिनंदन. ही ऐतिहासिक कामगिरी भारतातील असंख्य तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. पुढील वाटचालीसाथी खूप खूप शुभेच्छा.
Asian Para Games 2026: शीतल देवी आणि तोमर कुमारचा धमाका! Compound Mix मध्ये आणले सुवर्णपदक
राज्यभरात खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उभी करण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे. खेळाडूंना प्रशिक्षणादरम्यान आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी वेळेवर आर्थिक मदत सरकारतर्फे केली जात असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी भरीव रोख बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांना सुरक्षेची आणि स्थैर्याची हमी दिली जात आहे.
एशियन पैरा गेम्स-2026 में तीरंदाजी की महिला W1 स्पर्धा में रजत पदक जीतने पर उत्तर प्रदेश की बेटी स्वाति चौधरी जी को बहुत-बहुत बधाई। उनकी यह ऐतिहासिक उपलब्धि भारत के अनगिनत युवाओं को अपने सपनों को साकार करने के लिए प्रेरित करेगी। हम सभी को आप पर गर्व है। उज्ज्वल भविष्य के लिए हार्दिक शुभकामनाएं। — Yogi Adityanath (@myogiadityanath) October 22, 2026
उत्तर प्रदेश शासनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक विकसित करण्यासाठी काही महत्वाची पावले उचलली आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. खेळाडूंच्या विकासासाठी राज्यभरात आधुनिक साधनांची निर्मिती केली जात असून, यामुळे उत्तर प्रदेश हे देशातील अग्रगण्य क्रीडा केंद्र म्हणून उदयास येत आहे.
Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित
विविध जिल्ह्यांमध्ये स्टेडियम, बहुउद्देशीय क्रीडा हॉल , स्विमिंग पूल आणि सिंथेटिक कोर्ट यांसारख्या उच्चस्तरीय सुविधा निर्माण केल्या जात आहेत. एक जनपद-एक खेल योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमधील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये ‘खेलो इंडिया सेंटर’ मंजूर करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक क्रीडा प्रतिभेला व्यावसायिक प्रशिक्षण, दर्जेदार खेळ किट आणि आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.