
Asian Para Games 2026
यापूर्वी सिमरनने २०० मीटर T12 प्रकारात २४.८० सेकंदांची वेळ देत सुवर्णपदक जिंकले. आता तिने 100 मीटर प्रकारात देखील सुवर्णपदक जिंकले आहे. हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा गेम्स २०२२ मध्ये सिमरनने १२.६८ सेकंदांच्या वेळेसह रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर यंदा तिने थेट सुवर्ण पदक जिंकले आहे. सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. भारताने आतापर्यंत एकूण 47 पदके जिंकली आहेत.
प्रणव देसाई यांनी पुरुषांच्या १०० मीटर T64 स्पर्धेत ११.९६ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. भारताने पुरुषांच्या १०० मीटर T47 स्पर्धेत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. दिलीप गावित महादु यांनी १०.६९ सेकंदात सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोर्सिंगनाकाथी यांनी १०.७२ सेकंदांच्या वेळेसह रौप्य पदक आपल्या नावावर केले आहे.
SIMRAN SHARMA AT ASIAN PARA GAMES 2026 🥇 Gold Medal in Women’s 100m T12
🥇 Gold Medal in Women’s 200m T12 WHAT AN INCREDIBLE PARA ATHLETE! 🔥 https://t.co/1qNqvDI9vH — The Khel India (@TheKhelIndia) October 21, 2026
Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
पुरुष जॅवलिन थ्रो F55 इव्हेंटमध्ये, सुखचैन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकले आहे. मनजीत व्यास यांनी पुरुषांच्या जॅवलिन थ्रो F12/13 स्पर्धेत ६१.०३ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक मिळवले. त्यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ही कामगिरी सध्या केली आहे.
भारताने पुरुषांच्या जॅवलिन थ्रो F53 स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. प्रदीप कुमार यांनी आपल्या शेवटच्या प्रयत्नात २७.४५ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकले, तर आयुष वर्मा यांनी आपल्या पाचव्या प्रयत्नात १७.८८ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक जिंकून भारताची मान अभिमानाने उंचवली आहे.
Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक