Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP T20 League: रिंकू सिंहच्या नेतृत्वात मेरठची टीम चॅम्पियन, फायनलमध्ये लखनऊला 94 धावांनी चिरडले

UP T20 League: UP T20 League 2026 च्या अंतिम सामन्यात, रिंकू सिंगच्या नेतृत्वाखालील मेरठ मॅव्हरिक्सने भुवनेश्वर कुमारच्या लखनौ फाल्कन्सला 94 धावांनी पराभूत करून आपले दुसरे विजेतेपद पटकावले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 07, 2026 | 10:39 AM
UP T20 League मध्ये रिंकू सिंगची टीम जिंकली (फोटो सौजन्य - X.com)

UP T20 League मध्ये रिंकू सिंगची टीम जिंकली (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • युपी टी२० लीगमध्ये रिंकू सिंहचा जलवा
  • भुवनेश्वर कुमारच्या टीमला नमवून बनले चॅम्पियन
  • मेरठ मॅव्हरिक्सने लखनऊ फाल्कन्सला ९४ धावांनी हरवले 
UP T20 League: यूपी टी२० लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात, रिंकू सिंगच्या नेतृत्वाखालील मेरठ मॅव्हरिक्सने भुवनेश्वर कुमारच्या लखनौ फाल्कन्सला एकतर्फी सामन्यात ९४ धावांनी पराभूत केले. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, मेरठने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि आपला पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या लखनौला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे, मेरठने या लीगच्या अंतिम फेरीत सलग चौथ्यांदा प्रवेश केला आहे. रिंकू सिंगने यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये उपकर्णधारपद भूषवले होते.

दिव्यांश जोशीने मेरठसाठी शानदार शतक झळकावले

मेरठ मॅव्हरिक्सचा कर्णधार रिंकू सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्वस्तिक चिकारा आणि दिव्यांश जोशी यांनी ५३ धावांची वेगवान सलामीची भागीदारी रचली. यानंतर, सलामीवीर दिव्यांश जोशीने धडाकेबाज कामगिरी करत लखनौच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसह संपूर्ण संघावर हल्ला चढवला आणि अवघ्या ४० चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांसह १०५ धावांचे झंझत शतक ठोकले. जोशीच्या शानदार शतकामुळे, मेरठ मॅव्हरिक्सने आपल्या २० षटकांत ७ गडी गमावून २०३ धावांची भक्कम धावसंख्या उभारली.

UP T20 League : रिंकू सिंग ठरला फेल, दिव्यांश राजपूतने खेळली तुफानी खेळी! मेरठ मॅव्हेरिक्सने केला नोएडा किंग्जचा पराभव

लखनौचे फलंदाज अपयशी ठरले

२०४ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर लखनौ फाल्कन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आणि ते सुरुवातीपासूनच बॅकफूटवर होते. एमडी सैफ (१०), हिमांशू सिंग (५) आणि आराध्या यादव (५) यांसारखे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीत, अजित वर्माने २४ चेंडूंमध्ये ३९ धावा (४ चौकार, २ षटकार) करून थोडा प्रतिकार दाखवला आणि कृतज्ञ कुमार सिंगने २१ धावांची भर घातली, परंतु संघाला सामन्यात परत आणण्यासाठी हे प्रयत्न अपुरे ठरले.

लखनौचा संपूर्ण संघ १६ षटकांत केवळ १०९ धावांवर सर्वबाद झाला, ज्यात कर्णधार भुवनेश्वर कुमार ५ धावांवर नाबाद राहिला. मेरठकडून विशाल चौधरीने भेदक गोलंदाजी करत चार षटकांत केवळ २४ धावा देऊन चार बळी घेतले. झीशान अन्सारीनेही केवळ १२ धावांत दोन बळी घेत उत्कृष्ट साथ दिली. करण चौधरी, विजय कुमार आणि यश गर्ग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला

UP T20 League : 6,6,6,6,6,6…आशिया कप 2025 आधी रिंकुने केला कहर! झळकावले शतक, मेरठ मॅव्हेरिक्सला मिळवून दिला विजय

दिव्यांग जोशीला सामनावीर पुरस्कार मिळाला

मेरठचा मुख्य फिरकी गोलंदाज, झीशान अन्सारीने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत आपल्या शानदार हंगामाची सांगता केली. त्याने २५ बळींसह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून हंगाम पूर्ण केला आणि या सर्वोच्च कामगिरीबद्दल पर्पल कॅप पटकावली. विशाल चौधरी अंतिम सामन्यात मेरठचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार षटकांत २४ धावा देऊन चार बळी घेतले. दिव्यांग जोशीला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Web Title: Upt20 league final win by rinku singh meerut mavericks lucknow falcons lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Meerut
  • Rinku Singh
  • UP T20 League

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.