Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meerut Snakebite Murder Case : पत्नी आणि प्रियकराला फाशी; न्यायाधीशांनी सावित्री-यमराजांचा का केला उल्लेख?

Meerut Snakebite Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील चर्चित सर्पदंश हत्याकांडात पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. पती अमित उर्फ मिक्की कश्यप याची हत्या करून ती सापाच्या दंशामुळे झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 16, 2026 | 08:01 PM
Meerut Snakebite Murder Case : पत्नी आणि प्रियकराला फाशी; न्यायाधीशांनी सावित्री-यमराजांचा का केला उल्लेख?

Meerut Snakebite Murder Case : पत्नी आणि प्रियकराला फाशी; न्यायाधीशांनी सावित्री-यमराजांचा का केला उल्लेख?

Follow Us
Follow Us:
  • बिछान्यावर मृतदेह, खाली जिवंत साप
  • शवविच्छेदन अहवालातून हत्येचा उलगडा
  • भावाच्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात
 

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील चर्चित सर्पदंश हत्याकांडात (Meerut Snakebite Murder Case) पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. पती अमित कश्यप उर्फ मिक्की कश्यप याची हत्या करून ती सापाच्या दंशामुळे झाल्याचा बनाव रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी सावित्री आणि यमराज यांच्या पौराणिक कथेचा संदर्भ दिल्याने या निकालाची चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षा सुनावण्यापूर्वी सावित्री-यमराजांचा उल्लेख

मेरठमधील बहसूमा परिसरातील अकबरपूर सादात गावातील अमित कश्यप हत्याप्रकरणात अपर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (एडीजे-12) जयवीर सिंह नागर यांच्या न्यायालयाने रविता आणि अमरदीप यांना हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांचा संदर्भ दिला. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी यमराजांशी संघर्ष केल्याच्या कथेकडे लक्ष वेधत त्यांनी या प्रकरणातील पत्नीच्या कृत्याशी त्याची तुलना केली. अधर्माचा धर्मावर विजय होऊ शकत नाही, असा आशयही त्यांनी व्यक्त केल्याचे वृत्तात नमूद आहे.

Gujarat Crime : रिफायनरी मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; 1.53 कोटींच्या सोने-चांदीच्या लुटीप्रकरणी 10 जणांना अटक

बिछान्यावर मृतदेह, खाली जिवंत साप

ही घटना 13 एप्रिल 2025 रोजी उघडकीस आली. अमित कश्यप याचा मृतदेह त्याच्या बिछान्यावर आढळला. मृतदेहाखाली जिवंत साप होता. अमितच्या शरीरावर साप चावल्याच्या सुमारे दहा खुणा आढळल्याने सुरुवातीला सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

रवितानेही पतीचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालातून वेगळेच सत्य समोर आले.

शवविच्छेदन अहवालातून हत्येचा उलगडा

शवविच्छेदन अहवालानुसार अमितचा मृत्यू सर्पदंशामुळे नव्हे, तर गुदमरल्यामुळे झाला होता. त्याचा गळा, नाक आणि तोंड दाबण्यात आले होते. या हल्ल्यात त्याच्या मानेतील हायॉइड हाड आणि थायरॉइड कार्टिलेजचे नुकसान झाल्याचेही समोर आले.

पोलिसांच्या तपासात रविता आणि अमरदीप यांच्यात घटनेच्या आधीच्या 24 तासांत तब्बल 51 वेळा फोनवर संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय आणि डिजिटल पुराव्यांमुळे सर्पदंशाचा बनाव रचून हत्या केल्याचा आरोप अधिक ठळक झाला.

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

 

प्रेमसंबंधातून हत्येचा कट?

पोलिसांच्या तपासानुसार, रविता आणि अमरदीप यांच्यात प्रेमसंबंध होते. अमरदीप आणि अमित हे मित्र होते. दोघेही टाइल्स आणि दगड बसवण्याचे काम करत होते. रविता आणि अमरदीप यांच्यातील संबंधांची माहिती अमितला मिळाल्यानंतर त्याने विरोध केल्याचे तपासात समोर आले.

अमित या नात्यात अडथळा ठरत असल्याने त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. 12 एप्रिल 2025 च्या रात्री अमित झोपलेला असताना त्याचे हात पकडून गळा दाबण्यात आला. त्यानंतर हत्या सर्पदंशामुळे झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी बिछान्यावर जिवंत साप सोडण्यात आल्याचे तपासात सांगण्यात आले.

अमरदीपने गावात देवीच्या जागरणाचे कारण सांगून कृष्ण नावाच्या गारुड्याकडून एक हजार रुपयांना साप विकत घेतल्याचा आरोप आहे. कृष्णने हा साप त्याचे आजोबा प्रीतमनाथ यांच्याकडून आणला होता.

भावाच्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात

अमितचा भाऊ मोनू कश्यप याने 16 एप्रिल 2025 रोजी रविता आणि अमरदीप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून 26 जून 2025 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृत अमितचा भाऊ मोनू, आई मुनेश देवी, गारुडी, डॉक्टर कपिल गर्ग आणि तपास अधिकारी इंदू वर्मा यांचा समावेश होता.

या प्रकरणात सर्पदंशाचा बनाव, शवविच्छेदन अहवाल आणि डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरले. न्यायालयाने रविता आणि अमरदीप यांना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेरठ सर्पदंश हत्याकांडात कोणाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना अमित कश्यप यांच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

  • Que: बिछान्यावर जिवंत साप का सोडण्यात आला होता?

    Ans: पोलिसांच्या तपासानुसार, हत्येला सर्पदंशाचे स्वरूप देऊन नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव करण्यासाठी बिछान्यावर जिवंत साप सोडण्यात आला.

  • Que: या प्रकरणात कोणते पुरावे महत्त्वाचे ठरले?

    Ans: शवविच्छेदन अहवाल, रविता आणि अमरदीप यांच्यातील फोनवरील संभाषणांची माहिती आणि साक्षीदारांचे जबाब हे तपासातील महत्त्वाचे पुरावे ठरले.

Web Title: Meerut snakebite murder case wife lover death sentence savri yamraj rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Death Penalty
  • Meerut

संबंधित बातम्या

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
1

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
2

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.