Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varun Chakravarthy सांभाळणार या संघाची कमान! T20 मध्ये या संघाला बनवणार का चॅम्पियन?

२६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या हंगामाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याची तामिळनाडू संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 14, 2025 | 01:08 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:
  • २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
  • भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती सांभाळणार तामिळनाडू संघाची धूरा
  • नारायण जगदीसन संघाचा असणार उपकर्णधार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचे खेळाडू सध्या कसोटी मालिका खेळण्यामध्ये व्यस्त आहेत तर आता काही दिवसांमध्ये टी20 विश्वचषक देखील सुरु होणार आहे त्यासाठी संघाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतामध्ये काही देशातंर्गत स्पर्धा देखील खेळवल्या जात आहेत. २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या हंगामाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याची तामिळनाडू संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

खरं तर, वरुण चक्रवर्तीने नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नारायण जगदीसन त्याचे उपकर्णधार म्हणून काम पाहतील. डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर आणि उदयोन्मुख खेळाडू आंद्रे सिद्धार्थ यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन देखील संघाचा भाग आहे. या हंगामात रणजी करंडकात तामिळनाडूची सुरुवात सामान्य राहिली आहे. संघाला एलिट ग्रुप डी मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, कर्नाटक, त्रिपुरा, झारखंड आणि सौराष्ट्र सारखे संघ आहेत. तामिळनाडू अहमदाबादमध्ये राजस्थानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

🚨 BREAKING 🚨 Varun Chakaravarthy has been appointed as the captain of Tamil Nadu for the Syed Mushtaq Ali Trophy 2025. 🏆#Cricket #Varun #SMAT #TamilNadu pic.twitter.com/txfkYDssDM — Sportskeeda (@Sportskeeda) November 13, 2025

तामिळनाडूचा संपूर्ण संघ:

वरुण चक्रवर्ती (कर्णधार), नारायण जगदीसन (उपकर्णधार, यष्टिरक्षक), तुषार रायझा (यष्टीरक्षक), व्हीपी अमित सात्विक, शाहरुख खान, आंद्रे सिद्धार्थ, प्रदोष रंजन पॉल, शिवम सिंग, आर साई किशोर, एम सिद्धार्थ, टी नटराजन, ए. गुरव सिंग, आर साई किशोर, एम सिद्धार्थ, टी नटराजन, ए. आर सिलंबरासन, एस रितिक इसवरन (यष्टीरक्षक)

Web Title: Varun chakravarthy will lead this team will he make this team a champion in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Varun Chakravarthy

संबंधित बातम्या

जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड! कपिल देव आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांवर असेल लक्ष्य
1

जसप्रीत बुमराहने मोडला आर अश्विनचा रेकाॅर्ड! कपिल देव आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांवर असेल लक्ष्य

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज पव्हेलियनमध्ये, जसप्रीत बुमराहच्या हाती लागले दोन विकेट
2

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज पव्हेलियनमध्ये, जसप्रीत बुमराहच्या हाती लागले दोन विकेट

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार! BCCI ला केली एक खास विनंती
3

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार! BCCI ला केली एक खास विनंती

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत
4

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार! शार्दुल आणि रदरफोर्डनंतर, केकेआरचा स्टार गोलंदाज नजरेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.