
VHT 2025-26: Vaibhav Suryavanshi is unstoppable! He scored 31 runs off just 10 balls against Meghalaya.
Vaibhav Suryavanshi’s performance in VHT 2025-26 : बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक खेळीने चांगलाच चर्चेत येत आहे. दरम्यान विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या प्लेट ग्रुप सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतल्या. सोमवारी (२९ डिसेंबर) रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये मेघालयविरुद्ध बिहारकडून डावाची सुरुवात करताना वैभवने सूर्यवंशीने फक्त १० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ३१०.०० इतका होता.
बिहारच्या डावाची चांगली सुरुवात करून देणाऱ्या १४ वर्षीय वैभवला त्याचा डाव पुढे मात्र नेता आला नाही. २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आकाश कुमारने त्याला पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला झेलबाद करून माघारी पाठवले. या सामन्यात वैभवकडून खूप अपेक्षा लागून राहिल्या असताना मात्र तो पुन्हा एकदा एका लहान पण जलद खेळीच करू शकला.
यापूर्वी, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपला रुद्रावतार दाखवून दिला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध ऐतिहासिक खेळी करत त्याने फक्त ८४ चेंडूत १९० धावा ठोकल्या होत्या. त्याच्या खेळीने बिहारच्या विक्रमी ३९७ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका वठवली. त्या सामन्यात वैभवने केवळ ३६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते, जे भारतीय फलंदाजाचे चौथे सर्वात जलद लिस्ट ए शतक ठरले होते. ५९ चेंडूत १५० धावा करून त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावांचा विश्वविक्रम देखील प्रस्थापित करून एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला होता.
वैभव सूर्यवंशी हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. तथापि, राष्ट्रीय कर्तव्यामुळे, विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये तो बिहारकडून खेळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे बोलले जाते आहे.
हेही वाचा : ‘160 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकणे…’ वेगाचे श्रेय आईला देत माजी गोलंदाज ब्रेट लीचे मोठे विधान
खरं तर, शनिवारी (२७ डिसेंबर) वैभवचा भारताच्या अंडर-१९ विश्वचषक संघात समावेश केला गेला आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेत देखील सहभागी होणार आहे. आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत, वैभव सुरवंशी या मालिकेत भारतीय अंडर-१९ संघाची धुरा सांभाळणार आहे.