Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित! हर्ष दुबे करणार 17 सदस्यीय संघाचे नेतृत्व 

बीसीसीआय आयोजित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १७ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 20, 2025 | 07:16 PM
Vijay Hazare Trophy: Vidarbha squad announced for the Vijay Hazare Trophy! Harsh Dubey will lead the 17-member team.

Vijay Hazare Trophy: Vidarbha squad announced for the Vijay Hazare Trophy! Harsh Dubey will lead the 17-member team.

Follow Us
Close
Follow Us:

Vidarbha squad announced for the Vijay Hazare Trophy :  २४ डिसेंबरपासून बीसीसीआय आयोजित विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून हर्ष दुबेकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज यश ठाकूरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हे एलिट ग्रुप बी सामने २४ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विदर्भ आपला सलामीचा सामना २४ जानेवारी रोजी बंगालविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत संघ सात सामने खेळतील.

हेही वाचा : Ashes series 2025: पॅट कमिन्सने मोडला मिचेल जॉन्सनचा विक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम

शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) च्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठकीमध्ये संघाची निवड करण्यात आली. हा संघ अनुभव आणि तरुणाईच्या उत्साहाचे संतुलन साधल्याचे दाखवतो. टॉप ऑर्डरमध्ये अथर्व तायडे, ध्रुव शौरे आणि अमन मोखाडे या फलंदाजांचा समावेश असून  गोलंदाजी आक्रमणात दर्शन नळकांडे, नचिकेत भुते आणि गणेश भोसले यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. शिवम देशमुख आणि अक्षय वाडकर यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. उस्मान गनी (प्रशिक्षक) आणि धर्मेंद्र अहलावत (सहाय्यक प्रशिक्षक) हे प्रभारी असतील. या स्पर्धेत विदर्भ संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

हेही वाचा : ना बुमराह ना हार्दिक… या मालिकेत मिळणार विश्रांती! कोणत्या खेळाडूला मिळणार जागा? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मागील  हंगामात संघ उपविजेपदावर समाधान

विदर्भने २०२४-२५ विजय हजारे ट्रॉफीमध्ये असाधारणपणे चांगली कामगिरी केली बजावली आणि उपविजेतेपद पटकावले होते.  संघाने अंतिम सामन्यासह सर्व लीग आणि उपांत्य फेरीचे सामने जिंकण्याची किमया साधली होती. गेल्या हंगामात विदर्भाकडून खेळणारा करुण नायर या वर्षी खेळण्याची शक्यता आहे. कारण तो त्याच्या आठ सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात बाद झाला होता आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक ७७९ धावा करणारा फलंदाज ठरला होता, ज्यामुळे संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यास मोठी मदत झाली होती.

 विदर्भाचा संघ खालीलप्रमाणे

हर्ष दुबे (कर्णधार), यश ठाकूर (उपकर्णधार), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, यश राठोड, शिवम देशमुख (यष्टीरक्षक), अक्षय वाडकर, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे, यश कदम, आर. समर्थ, दिवंगत शुवान, पार्थ शुन्हा, पार्थ शुक्ल, दि. दुबे, गणेश भोसले.

विदर्भाचे सामन्यांचे वेळापत्रक

  1. २४ डिसेंबर: बंगाल
  2. २६ डिसेंबर: हैदराबाद
  3. २९ डिसेंबर: जम्मू आणि काश्मीर
  4. ३१ डिसेंबर: चंदीगड
  5. ३ जानेवारी: बडोदा
  6. ६ जानेवारी: उत्तर प्रदेश
  7. ८ जानेवारी: आसाम

Web Title: Vidarbhas squad for the vijay hazare trophy has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • bcci
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

T20 World Cup साठी भारतीय संघात कधीपर्यंत करता येणार बदल? ICC चे नियम माहिती आहेत का? वाचा सविस्तर 
1

T20 World Cup साठी भारतीय संघात कधीपर्यंत करता येणार बदल? ICC चे नियम माहिती आहेत का? वाचा सविस्तर 

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा
2

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा

हिटमॅन खेळणार या तारखेला Vijay Hazare Trophy 2025–26 चा सामना! झाली संघाची घोषणा, वाचा संपूर्ण माहिती
3

हिटमॅन खेळणार या तारखेला Vijay Hazare Trophy 2025–26 चा सामना! झाली संघाची घोषणा, वाचा संपूर्ण माहिती

IND vs SA 4th t20I : ‘सामने केरळमध्ये नाहीत…’ संसद परिसरात राजीव शुक्ला यांनी घेतली शशी थरूर यांची फिरकी; पहा Video
4

IND vs SA 4th t20I : ‘सामने केरळमध्ये नाहीत…’ संसद परिसरात राजीव शुक्ला यांनी घेतली शशी थरूर यांची फिरकी; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.