Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Gautam gambhir Emotional message to Ajit Agarkar: टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकरचा कार्यकाळ संपला आहे. आगरकरला निरोप देताना, प्रशिक्षक गौतम गंभीरने एक खास पोस्ट लिहिली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 03:11 PM
Gautam gambhir message to Ajit Agarkar

Gautam gambhir message to Ajit Agarkar

Follow Us
Follow Us:
  • अजित आगरकरला निरोप देताना गौतम गंभीर भावुक
  • आगरकरसाठी गंभीरांचा खास मेसेज
  • नेमकं काय म्हणाले?
Gautam gambhir Emotional message to Ajit Agarkar: भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकरचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपला आहे. त्याने तीन वर्षे टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहिले. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. बीसीसीआय त्याचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवू शकते, असे वृत्त होते. परंतु, नंतर बीसीसीआय आणि आगरकर यांच्यात काही तरी बिनसल्याची चर्चा सुरु झाली. यानंतर, आगरकरचा करार न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अजित आगरकरसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं

अजित आगरकरसाठी गंभीरची खास पोस्ट

गौतम गंभीरने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये अजित आगरकर यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. भारताच्या तीन आयसीसी ट्रॉफी विजयांचे श्रेयही त्याने आगरकरला दिले. आपल्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘ अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा एक सन्मान होता. तिन्ही आयसीसी ट्रॉफी तुमच्या निष्ठेचे प्रतीक आहेत. तुम्ही नेहमी संघालाच प्रथम प्राधान्य देता. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की इतिहास तुमच्याशी चांगला व्यवहार करेल. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’

Dear Ajit Bhai, an absolute honour to work with you. Those 3 ICC trophies are testimony of your conviction: Team first & Team ahead, always.. I must say, History will be kinder to you. Thank you for everything. My heartfelt wishes for your future endeavours !! pic.twitter.com/gYQN0fea8X — Gautam Gambhir (@GautamGambhir) October 7, 2026

अजित आगरकरच्या कार्यकाळात भारतीय संघ यशस्वी

बीसीसीआयने जुलै २०२३ मध्ये अजित आगरकरची भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. यानंतर, भारतीय संघाने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि त्याच वर्षी आशिया कप ट्रॉफी जिंकली. आगरकरच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०२४ आणि २०२६ चे टी-२० विश्वचषक जिंकले. भारतीय संघाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली. अ

आगरकरच्या कार्यकाळात भारताने केलेली कामगिरी

  • आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक
  • आशिया कप २०२३ विजेता
  • २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता
  • टी२० विश्वचषक २०२४ विजेता
  • चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता
  • आशिया कप २०२५ विजेता
  • टी२० विश्वचषक २०२६ विजेता
  • आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक
अजित आगरकरच्या कार्यकाळात टीम इंडियाच्या निवडीवरून आणि काही निर्णयांवरून वाद निर्माण झाले होते. परंतु, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आगरकरच्या कार्यकाळानंतर, बीसीसीआयने आता नवीन निवडकर्त्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

Web Title: Ajit agarkar tenure ends gautam gambhir emotional message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • Gautam Gambhir
  • Social Media

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
1

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया
4

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.