
अवघ्या ११ तास ५९ मिनिटांत ८१ किमी जलतरण
मूळची अवसरी खुर्द येथील रहिवासी असलेली विदी सध्या वाशी (नवी मुंबई) येथील फ्र. अॅग्नेल हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. एवढे प्रदीर्घ अंतर निर्धारित वेळेत पूर्ण करणारी ती सर्वात कमी वयाची जलतरणपटू ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या ३ वर्षांत एकाही महिला जलतरणपटूला निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण करता आले नव्हते, तो विक्रम विदीने मोडीत काढला.
२० किमी जलतरण: ४ तास ३ मिनिटांत यशस्वी पूर्तता.
४२ किमी जलतरण: ७ तास ३२ मिनिटांत अंतर पार.
६ किमी राष्ट्रीय स्पर्धा (कोची): सुवर्णपदकाची कमाई.
विदी सध्या पलावा (डोंबिवली) येथील जलतरण केंद्रात दररोज ३ ते ४ तास कठोर सराव करत आहे. तिला नामांकित जलतरणपटू व प्रशिक्षक रुपाली रेपाळे तसेच अनिरुद्ध महाडिक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भविष्यात विख्यात ‘इंग्लिश चॅनेल’ पोहून पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचे तिचे स्वप्न आहे.
“अवघ्या १३व्या वर्षी विदी भोरने ८१ किलोमीटर नदी जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. तिची जिद्द, अपार मेहनत आणि आत्मविश्वास संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यात ती जागतिक पातळीवर देशाचे नाव निश्चितच मोठे करेल.”
अंशुमन झिंगरन ठरला ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू
— अरुण गिरे (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद)
“८१ किलोमीटरचा हा प्रदीर्घ प्रवास माझ्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता; मात्र सातत्यपूर्ण सराव, पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यांमुळेच मी हे अंतर पार करू शकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत इंग्लिश चॅनेल पार करणे हे माझे पुढील अंतिम उद्दिष्ट आहे.”
— विदी भोर (युवा जलतरणपटू)