
former captain suryakumar yadav
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2026 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादववर केवळ कर्णधारपदच गमावण्याची वेळ आली नाही, तर त्याला थेट भारतीय संघातूनही वगळण्यात आले. सूर्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का होता. आता पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर आणि कठीण काळातून जाताना आलेल्या अनुभवावर सूर्यकुमार यादवने खुलेपणाने भाष्य केले आहे.
आला रे आला! Suryakumar Yadav ची बॅट तळपणार! Syed Mushtaq Ali Trophy त ‘या’ संघाचे करणार नेतृत्व
भारतीय संघातून अचानक बाहेर झाल्याने सुरुवातीचा काळ म्हणजे अगदी पहिले दोन महीने तर अत्यंत मानसिक संघर्ष आणि कठीण होते. माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील हा सर्वात कठीण काळ होता. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सूर्यकुमार यादवने याबाबत भाष्य केले आहे. संघातून बाहेर झाल्यानंतरचा कालावधी कसा होता यावर त्याने खुलेपणाने भाष्य केले आहे. ‘टी- 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा काळ माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूपच कठीण गेला. मी या वास्तवापासून किंवा सत्यापासून दूर जाऊ इच्छित नाही. जर तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक नसाल, तर तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकत नाही, असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
या कठीण काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक अत्यंत आनंदाची आणि सुखद घटना घडली. आयपीएलच्या (IPL) दरम्यान मे महिन्यात त्याच्या घरी आनंदाची बातमी समोर आली. सूर्यकुमारला कन्यारत्न झाले. लेकीच्या आगमनानंतरचे मागील काही महिने त्याच्यासाठी अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय ठरले, ज्यामुळे त्याला मानसिक धक्क्यातून सावरण्यास खूप मोठी मदत मिळाली, असे त्याने सांगितले.
सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानावर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी ‘सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६’ या प्रतिष्ठित देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा केली आहे.
Ans: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी वर्ल्डकप जिंकला आहे.
Ans: भारतीय संघातून अचानक बाहेर झाल्याने सुरुवातीचा काळ म्हणजे अगदी पहिले दोन महीने तर अत्यंत मानसिक संघर्ष आणि कठीण होते.