
Vijay Hazare 2025: Vaibhav Suryavanshi shattered a world record! He surpassed de Villiers; this has happened for the first time in 62 years...
Vaibhav Suryavanshi broke the world record.: वैभव सूर्यवंशीने बुधवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात झळकवले. रांची येथील प्लेट ग्रुप सामन्यात, वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध चांगलाच हल्लाबोल चढवला. त्याने फक्त ८४ चेंडूत १९०धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १५ षटकार आणि १६ चौकार लगावले. त्याने फक्त ३५ चेंडूत त्याचे पहिले लिस्ट ए शतक देखील पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याने फक्त १४ वर्षे आणि २७२ दिवसांच्या वयात हही किमया साधली. तसेच वैभवने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम केला जो गेल्या ६२ वर्षांत कोणताही फलंदाज साध्य करू शकलेला नाही. तसेच त्याने १९० धावांची खेळी करत लहान वयात आणखी संस्मरणीय अशी कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा : IND VS SA : ‘गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत…’ बूमराहच्या ‘बुटका’ संबोधनावर टेम्बा बावुमाने सोडले मौन
वैभव सूर्यवंशी भारताचा दुसरा सर्वात जलद लिस्ट ए शतक करणारा फलंदाजच बनला नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्याने लिस्ट ए क्रिकेटच्या जवळजवळ ६२ वर्षांच्या इतिहासात तो १५० धावा करणारा सर्वात जलद फलंदाज देखील बनला आहे. वैभवनेही सर्वात कमी वयात ही कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी, ही कामगिरी एबी डिव्हिलियर्सच्या नवे जमा होती. एबी डिव्हिलियर्सने ६४ चेंडूत १५० धावा फटकावल्या होत्या. एबीने २०१५ च्या विश्वचषक सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता. तर वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ५४ चेंडूत हा भीम पराक्रम केला. तसेच वैभवच्या १९० धावांच्या खेळीमध्ये त्याने केवळ चौकार आणि षटकारांसह १५४ धावा फटकावल्या. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात चौकार आणि षटकारांसह एकाच डावात केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे.
वैभव सूर्यवंशीने त्याच्या १९० धावांच्या खेळी दरम्यान एकूण १५ षटकार लगावले आहेत. यामुळे तो आता लिस्ट ए क्रिकेटच्या ५८ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील बनला आहे. एकाच लिस्ट ए सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम श्रीलंकेच्या के.आय.सी. अलासंका यांच्या नावावर जमा आहे. जून २०२४ रोजी दांबुला येथे खेळल्या गेलेल्या कोलंबो विरुद्ध जाफना सामन्यात त्याने २०६ धावांच्या नाबाद खेळीत १६ षटकार लगावले होते.