Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम! चौकार लगावताच सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री

२०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने इतिहास रचला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर विराट कोहलीने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,०० धावा पूर्ण केल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 24, 2025 | 03:32 PM
Vijay Hazare Trophy 2025: Virat Kohli sets record in List A cricket! He made a royal entry into Sachin Tendulkar's club after scoring one run

Vijay Hazare Trophy 2025: Virat Kohli sets record in List A cricket! He made a royal entry into Sachin Tendulkar's club after scoring one run

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli sets a record in List A cricket: मोठ्या विश्रांतीनंतर विराट कोहली  विजय हजारे ट्रॉफीमध्ये परतला आहे. या स्टार भारतीय खेळाडूने आता खास   टप्पा गाठला आहे. २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळत असलेल्या विराट कोहलीने मैदानावर उतरताच इतिहास घडवला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर फलंदाजीसाठी येत असताना, त्याने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा : ICC T20 rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताची दीप्ती चमकली! पहिल्यांदाच झाली अव्वलस्थानी विराजमान

दिल्लीचा पहिला बळी संघाच्या एका धावसंख्येसह गेला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. यामध्ये खास म्हणजे, हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त एका धावेची आवश्यकता होती, जी त्याने पहिल्याच चेंडूवरच  गाठली आणि इतिहास रचला.

विराट सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये सामील

लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण करताच विराट कोहली हा टप्पा गाठणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा होता, ज्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१,९९९ धावा फटकावण्याची किमया साधली होती. शिवाय, विराट कोहली लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील केवळ नववा फलंदाज बनला आहे. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय दिग्गजांमध्ये आपले स्थान आणखी बळकट केले आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज खालीलप्रमाणे

  1. ग्राहम गूच – २२,२११ धावा
  2. ग्रॅम हिक – २२,०५९ धावा
  3. सचिन तेंडुलकर – २१,९९९ धावा
  4. कुमार संगकारा – १९,४५६ धावा
  5. विव्हियन रिचर्ड्स – १६,९९५ धावा
  6. रिकी पॉन्टिंग – १६,३६३ धावा
  7. गॉर्डन ग्रीनिज – १६,३४९ धावा
  8. सनथ जयसूर्या – १६,१२८ धावा
  9. विराट कोहली – १६,००३* धावा

विराटला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

विराट कोहलीने २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळणार हे स्पष्ट होताच, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. इतक्या वर्षांनंतर कोहलीला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याची प्रतीक्षा अखेर संपली असून त्याने पहिल्याच सामन्यात एक मोठा टप्पा गाठून आपली क्षमता सिद्ध केली.

हेही वाचा : Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीचा झंजावता सुरूच! विजय हजारे ट्रॉफीमध्ये ठोकले जलद शतक; अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू

सामन्याची परिस्थिती

सामन्याबाबत सांगायचे झाले तर, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत आंध्रने ५० षटकांत ८ गडी गमावून २९८ धावा फटकावल्या. आंध्रकडून रिकी भुईने १२२ धावा करत शानदार शतक लगावले. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट घेतल्या, तर प्रिन्स यादवने ३ विकेट काढल्या.

Web Title: Vijay hazare trophy 2025 virat kohlis record in list a cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Sachin Tendulkar
  • Vijay Hazare Trophy
  • virat kohali

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीचा झंजावता सुरूच! विजय हजारे ट्रॉफीमध्ये ठोकले जलद शतक; अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू 
1

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीचा झंजावता सुरूच! विजय हजारे ट्रॉफीमध्ये ठोकले जलद शतक; अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू 

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली
2

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील
3

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील

Vijay Hazare Trophy : सुर्या आणि दुबे खेळणार मुंबईसाठी, इशान किशन करणार झारखंडचे नेतृत्व! वाचा संपूर्ण माहिती
4

Vijay Hazare Trophy : सुर्या आणि दुबे खेळणार मुंबईसाठी, इशान किशन करणार झारखंडचे नेतृत्व! वाचा संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.