दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
दीप्ती शर्मा ७३७ रेटिंग गुण मिळवून आघाडीवर पोहचली आहे, जे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजापेक्षा एक रेटिंग गुण पुढे आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी पाच स्थानांनी वाढून ३६ व्या स्थानावर पोहोचली आहे, तर फिरकी गोलंदाज श्री चरणी १९ स्थानांनी वाढून ६९ व्या स्थानावर पोहोचली आहे. विशाखापट्टणममध्ये ४४ चेंडूत नाबाद ६९ धावा करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज पाच स्थानांनी वाढून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना अव्वल क्रमांकाची भारतीय फलंदाज आहे. ती तिसऱ्या स्थानावर आहे. शफाली वर्मा एका स्थानाने घसरून १० व्या स्थानावर आली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्मृतीच्या जागी अव्वल क्रमांकाची फलंदाज झाली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग शतके झळकावणारी वोल्वार्डने १२४ आणि १०० नाबाद धावा काढत स्मृतीवर नऊ गुणांची आघाडी घेतली आहे. वोल्वाड ने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८२० रेटिंग गुण मिळवले आहेत. आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस ४५ आणि ६४ धावा केल्यानंतर चार स्थानांनी पुढे १८ व्या स्थानावर आली आहे. तिची सहकारी एमी हंटर ३१ व्या स्थानावरून २८ व्या स्थानावर आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची सून लुस (सात स्थानांनी पुढे ३४ व्या स्थानावर) आणि डेन व्हॅन निकेर्क (२४ स्थानांनी पुढे ९५ व्या स्थानावर) यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.






