Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Appointed KSCA Vinay Kumar Head coach: भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार याची आगामी २०२६/२७ देशांतर्गत हंगामासाठी कर्नाटकच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 03:33 PM
Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी
Follow Us
Follow Us:
  • Team Indiaचा माजी स्टार आता कर्नाटकचा बॉस
  • विनय कुमार यांची मुख्य कोचपदी नियुक्ती
  • विनयची क्रिकेट कारकिर्द
भारताचे माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार यांची आगामी २०२६/२७ देशांतर्गत हंगामासाठी कर्नाटक वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (KSCA) गुरुवारी केली. ४२ वर्षीय विनय कुमार हे येर गौड यांची जागा घेतील. येर गौड आता बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. कर्नाटकचे माजी फलंदाज दीपक चौगुले यांची संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sri Lanka Cricket: क्रिकेटविश्व हादरलं! खेळाडूंसोबतच्या वादानंतर श्रीलंकेच्या कोचचा मृत्यू; क्रिकेटपटू अटकेत

विनय कुमार कर्नाटक वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी

विनय कुमार यांची कर्नाटक वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी महाराजा टी-२० ट्रॉफीमध्ये हुबळी टायगर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आयएलटी२० मध्ये एमआय एमिरेट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. २०२१ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर, विनय यांनी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी टॅलेंट स्काउट म्हणूनही काम केले. त्यांनी स्टार स्पोर्ट्स कन्नडसाठी कॉमेंटेटर म्हणूनही काम केले आहे.

विनयची क्रिकेट कारकिर्द

विनय कुमारने भारतासाठी एक कसोटी, ३१ एकदिवसीय आणि नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि २०१५ व २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता. विनयची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी आहे. तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने या प्रतिष्ठित स्पर्धेत ४४२ विकेट घेतले असून तो सर्वकालीन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. १३९ प्रथम-श्रेणी सामन्यांच्या कारकिर्दीत, विनयने २२.४४ च्या सरासरीने ५०४ विकेट्स घेतले. कर्णधार म्हणून, त्याने कर्नाटकला ऐतिहासिक ‘डबल-ट्रेबल’ मिळवून दिले, ज्यात २०१३/१४ आणि २०१४/१५ हंगामात रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि दोनदा इराणी कप जिंकला

११ ऑक्टोबरपासून मोहिमेला सुरुवात

गेल्या वर्षी देशांतर्गत रणजी करंडक हंगामात उपविजेता ठरलेला कर्नाटक संघ, २०२६/२७ हंगामातील आपल्या मोहिमेला ११ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध सुरुवात करेल. केएससीएने (KSCA) इतर प्रशिक्षकांच्या नियुक्तीचीही घोषणा केली आहे. कर्नाटक आणि विदर्भ संघाचा माजी फलंदाज गणेश सतीश याची पुरुषांच्या २३ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खेळाडू कुणाल कपूरकडे पुरुषांच्या १९ वर्षांखालील संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो गेल्या काही वर्षांपासून १६ वर्षांखालील संघासोबत काम करत होता. अमित हे वरिष्ठ महिला आणि २३ वर्षांखालील महिला संघांचे मुख्य प्रशिक्षक असतील.

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

Web Title: Vinay kumar appointed karnataka senior mens head coach ksca cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Bengaluru
  • Karnataka
  • ranji trophy

संबंधित बातम्या

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
1

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका
2

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय
3

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
4

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.