
विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला
आरसीबीने जिंकली सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी
विराट कोहली अन् अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये दाखल
Virat Kohli and Anushka Sharma Meet Premanand Maharaj Video Viral: नुकतीच आयपीएल 2026 ची फायनल मॅच पार पडली. 31 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी केली होती. दरम्यान आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतल्याचे समजते आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबी चॅम्पियन झाल्यावर अवघ्या 48 तासांच्या आतमध्ये विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये दाखल झाला आहे. या मोठ्या विजयानंतर विराटने विश्रांती घेण्याऐवजी थेट वृंदावन गाठले आहे.
Virat Kohli and Anushka Sharma at the Premanand Ji Maharaj’s Ashram. 🙏 – Virat chanting ‘Radhe, Radhe’. ❤️ pic.twitter.com/e35WJ9Ze5F — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2026
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये दाखल झाले होते. या ठिकाणी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यापूर्वी आयपीएल 2026 असताना अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दरबारात दिसले होते. विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात बसल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.