
Indian Cricket : भारतीय क्रिकेटला अलविदा! सब्बिनेनी मेघनाची निवृत्ती; म्हणाली, 'क्रिकेट कायम हृदयात राहील'
भारतीय महिला क्रिकेट (Indian Cricket) संघाची माजी सलामीवीर फलंदाज सब्बिनेनी मेघना हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची मेघना सदस्य होती.
मेघनाने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना क्रिकेटशी असलेल्या भावनिक नात्याचाही उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जर्सी परिधान करून मैदानात उतरणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते, असे तिने म्हटले. क्रिकेटने आपल्याला धैर्य, नम्रता आणि आयुष्यभर जपाव्यात अशा आठवणी दिल्याची भावना तिने व्यक्त केली.
निवृत्तीची घोषणा करताना मेघनाने कुटुंबीय, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले. कारकिर्दीतील कठीण काळात कुटुंबीयांनी दिलेली साथ आणि त्याग यांचा तिने विशेष उल्लेख केला. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), आंध्र क्रिकेट असोसिएशन (ACA), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), गुजरात जायंट्स (GI)आणि RSPB या संस्थांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
खेळाडू म्हणून मैदानावर खेळण्याचे दिवस संपले असले, तरी क्रिकेटशी असलेले नाते कायम राहील, असे मेघनाने स्पष्ट केले. भविष्यात पुढील पिढीतील खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि क्रिकेटच्या विकासासाठी योगदान देणे, हे आपले ध्येय असल्याचेही तिने सांगितले.
India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
आंध्र प्रदेशातील 30 वर्षीय सब्बिनेनी मेघनाने 2016 ते 2022 या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने भारतासाठी 3 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने तिने 114 धावा केल्या, तर टी-20 क्रिकेटमध्ये एका अर्धशतकासह तिच्या नावावर 258 धावा आहेत.
मेघना महिला प्रीमियर लीगमध्येही खेळली आहे. 2024 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ती भाग होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर तिने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
आपल्या संदेशाच्या शेवटी मेघनाने क्रिकेटचे आभार मानताना म्हटले की, खेळण्याचे दिवस संपले तरी क्रिकेट तिच्या हृदयात, आवडीमध्ये आणि आयुष्याच्या उद्देशामध्ये कायम राहील. ज्या खेळाने आपल्याला सर्व काही दिले, त्या खेळासाठी भविष्यात योगदान देण्याची इच्छा असल्याचेही तिने नमूद केले.
Ans: सब्बिनेनी मेघनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे.
Ans: ती २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग होती.
Ans: तिने भारतासाठी तीन एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. अशा प्रकारे तिने एकूण 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.