फोटो सौजन्य - Bhajan Marg (X)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी घेतले प्रेमानंद महाराज यांचे दर्शन : भारताचे माजी कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा काल म्हणजेच 12 मे रोजी केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याचबरोबर क्रिकेट जगतामध्ये देखील त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर करून त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काल विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघेही विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करण्याआधी मुंबई विमानतळावर दिसले होते.
आता आणखी एक त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी वृंदावनला पोहोचले आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी प्रेमानंद महाराज यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पुण्य आणि यश याबद्दल संवाद साधला.
Virat Kohli and Anushka Sharma visited Premanand Ji Maharaj in Vrindavan for blessings. 🥹❤️#Cricket #Kohli #Blessings #Anuskha pic.twitter.com/dLabQczDvN
— Sportskeeda (@Sportskeeda) May 13, 2025
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्या दोघांनाही तिथे आधीही पाहिले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की क्रिकेटपटू आणि अभिनेत्री तिसऱ्यांदा संत प्रेमानंदांना भेटले. जानेवारी २०२३ मध्ये तो पहिल्यांदा प्रेमानंदला भेटला. यादरम्यान कोहली आणि अनुष्काने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले.
CAB ने भारतीय सैन्याला केला सलाम, सन्मानार्थ ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये हृदयस्पर्शी केलं काम
एक काळ असा होता जेव्हा विराट कोहलीची कामगिरी चांगली दिसत नव्हती. अशा परिस्थितीत विराटने त्याच्या आध्यात्मिक गुरूंना विचारले होते की अपयशावर मात कशी करावी? यावर संत प्रेमानंद म्हणाले होते की यश मिळविण्यासाठी सतत साधना करणे महत्त्वाचे आहे. विराटने त्याचा मूळ मंत्र पाळला आणि त्याचे परिणाम दिसून आले. विराट पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि त्याने शतकही ठोकले.
विराट कोहलीने या वर्षी ३ ते ५ जानेवारी दरम्यान सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. बीजीटी २०२४-२५ मालिकेतील ही शेवटची कसोटी होती, ज्यामध्ये कोहलीची फलंदाजी अपयशी ठरली. त्याने दोन्ही डावात मिळून २३ धावा केल्या. या कसोटीपासून कोहलीच्या कसोटी निवृत्तीबद्दल अटकळ बांधली जात होती. पण तरीही कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाईल असे मानले जात होते, पण त्याने सर्वांच्या आशा मोडल्या.