फोटो सौजन्य - Knight Club : KKR
ईडन गार्डन्स स्टेडियम : 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे चार आतंकवादी येऊन त्यांनी येथील पर्यटकांना गोळ्या झाडून मारले. त्यानंतर भारतामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी सिंदूर ऑपरेशन पुकारले आणि यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
त्यामुळे आयपीएल 1 आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. भारतीय सैन्याने प्रत्येक आघाडीवर योग्य उत्तर दिले. यावेळी संपूर्ण देश भारतीय सैन्याला सलाम करत आहे आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) देखील यामध्ये मागे नाही. बंगाल क्रिकेट असोसिएशनने सैन्याच्या प्रत्युत्तराच्या कारवाईबद्दल भारतीय सैनिकांना सलाम केला आहे. यासाठी त्याने ईडन गार्डन्स स्टेडियमवर हृदय जिंकणारे काम केले आहे. संपूर्ण देश कॅबच्या या पावलाचे कौतुक करत आहे आणि सैन्याच्या सन्मानार्थ मनापासून त्याच्या पाठीशी उभा आहे.
3 दिग्गजांना 1 कसोटी मालिकेने केले उद्ध्वस्त! चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ, वाचा सविस्तर
सीएबीने भारताच्या ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम ईडन गार्डन्सवर एक लांब पोस्टर लावला आहे ज्यामध्ये त्यांनी सैन्याचे कौतुक केले आहे आणि त्यांचे आभारही मानले आहेत. पोस्टरवर लिहिले आहे, “कृतज्ञता, अभिमान आणि आम्ही आमच्या नायकांना सलाम करतो.” दरम्यान, कॅबचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली म्हणाले, “आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. ते आम्हाला सुरक्षा पुरवत आहेत आणि म्हणूनच आम्ही येथे शांततेत राहत आहोत.”
VIDEO | The Cricket Association of Bengal (CAB) has put up a huge poster at the Eden Gardens in honour of Indian Defence Forces who fought with valour during India-Pakistan conflict. #CricketAssociationofBengal #EdenGardens #IndiaPakistanConflict pic.twitter.com/QQfijCQqxq
— Press Trust of India (@PTI_News) May 12, 2025
कोलकाता येथील ईडन गार्डन्सने आयपीएल-२०२५ च्या प्लेऑफचा क्वालिफायर-२ आणि अंतिम सामना आयोजित केला होता. पण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे लीग एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. तथापि, आता परिस्थिती सामान्य आहे आणि लवकरच लीग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु बीसीसीआय आता उर्वरित सामने तीन किंवा चार स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यात कोलकात्याचे नाव नाही.