फोटो सौजन्य – X
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमधील घराचा पत्ता : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. विराट कोहली मैदानावर बॅटने कहर करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर अनुष्का चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधुन निवृतीची घोषणा केली आणि त्यानंतर सर्व देशालाच त्याचा मोठा धक्का बसला होता. रोहित शर्माने आधी निवृतीची सोशल मिडीयावर पोस्ट केली होती त्यानंतर विराटने देखील इंस्टावर यासंदर्भात पोस्ट शेअर करुन अलविदा केला.
मागील बरेच वर्ष विराट कोहली हा लंडनला राहत आहे त्याचे लंडनमधील अनेक फोटो देखील सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र दिसतात तेव्हा तो क्षण लगेच व्हायरल होतो, पण हे जोडपे देश सोडून परदेशात स्थलांतरित झाल्यामुळे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान, विराट-अनुष्काच्या लंडनमधील घराचा पत्ता उघड झाला आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉटने एका निवेदनात त्यांच्या घराबद्दल एक मोठा इशारा दिला आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे त्याच्या मुलांसोबत 2024 पासून लंडनमध्ये राहत आहेत. अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या मुलालाही लंडनमध्ये जन्म दिला. हे जोडपे गुपचूप परदेशात स्थलांतरित झाले आहे, परंतु यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता चाहते या जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु अलीकडेच अनुष्का-कोहली लंडनमध्ये कुठे राहतात याबद्दल एक मोठा संकेत मिळाला आहे.
अलिकडेच, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉटने एका संभाषणादरम्यान संकेत दिला की भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या लंडनच्या सेंट जॉन्स वुड परिसरात राहत आहे. काही वृत्तांत आधी असा दावा करण्यात आला होता की कोहली लंडनमधील नॉटिंग हिल येथे राहत होता, परंतु त्याचे नेमके ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
IND vs ENG : आयपीएलचा स्टार वैभव सूर्यवंशीच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीवर टाका नजर! शतक, अर्धशतक…
आता ट्रॉटच्या विधानावरून असे संकेत मिळाले आहेत की तो सेंट जॉन्स वुड किंवा जवळच्या निवासी भागात स्थलांतरित झाला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान, ट्रॉट म्हणाला- “तो सेंट जॉन्स वुडमध्ये किंवा त्याच्या जवळ राहत नाही का? त्याला परत येण्यास राजी करता येत नाही का?” आम्ही तुम्हाला सांगतो की सेंट जॉन्स वुड परिसर लंडनच्या सुंदर आणि शांत निवासी घरांसाठी ओळखला जातो. वृत्तानुसार, विराट सध्या त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनमध्ये स्थायिक झाला आहे.