CSK Vs RCB: आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. दरम्यान या सामन्यात चेस मास्टर विराट कोहलीने एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. एकाच टीमसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी तब्बल 300 षटकार मारले आहेत.
विराट कोहलीने हा रेकॉर्ड बंगळुरू स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला आहे. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारून हा रेकॉर्ड केला आहे . विराट कोहलीने पहिलं षटकार मारल्यावर 300 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने अजून एक सिक्स मारला. आता विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 301 सिक्स मारले आहेत.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगमंत आतापर्यंत 51 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. गुरुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सकडून १०० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. हा पराभव आरआरचा ११ सामन्यांमधील तब्बल ८ वा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना एमआयने २ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरआर १७व्या षटकात ११७ धावांवर गारद झाला. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या, जो दीपक चहरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. एमआयने सलग सहावा विजय नोंदवला. या पराभवासह, आरआर आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा चेन्नई सुपर किंग्जनंतरचा दुसरा संघ बनला आहे. याशिवाय, इतर संघ अजून देखील प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून आहेत.
हेही वाचा : कोहली-धोनीच्या शेवटच्या आयपीएल लढतीत पाऊस खलनायक ठरेल का? RCB vs CSK सामना वाया गेला तर…