फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडीया
आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरु आहे यात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. रॅायल चॅलेंजर्स बंगलुरुचा संघ सध्या या सिझनमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. संघाचे चार सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी 3 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धत बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली कमालीच्या फॅार्ममध्ये आहे. त्याने हा सिझनमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. आता विराट कोहलीच्या संर्दभात मोठी अपडेट समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की विराट कोहलीने 300 कोटींची ऑफर नाकारली आहे. नक्की प्रकरण काय आहे यासंर्दभात सविस्तर वाचा.
आयपीएल २०२५ च्या दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने जर्मन स्पोर्ट्स ब्रँड प्यूमासोबतचा ११० कोटी रुपयांचा करार संपवल्याची मोठी बातमी आली आहे. पुमाने विराट कोहलीला पुढील वर्षासाठी कायम ठेवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, तरीही खेळाडूने त्याला मान्यता दिली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली आता स्वदेशी ब्रँड अॅजिलिटासमध्ये गुंतवणूकदार म्हणून सामील झाला आहे. विराट कोहलीने २०१७ मध्ये पुमासोबत ८ वर्षांसाठी करार केला.
Virat Kohli will end his 8-year contract worth 110cr with Puma India and join Agilitas Sports as its Brand Ambassador and will also hold equity in Agilitas Sports. (CNBC TV18). pic.twitter.com/afYe6DQ9Qg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 7, 2024
विराट कोहलीने करार संपवल्याची पुष्टी प्यूमा इंडियाने केली आहे. प्यूमा इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “प्यूमा विराटला त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देते… गेल्या काही वर्षांपासून त्याच्यासोबतचा हा एक अद्भुत संबंध आहे. एक क्रीडा ब्रँड म्हणून, प्यूमा पुढच्या पिढीतील खेळाडूंमध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत राहील.”
CSK vs KKR Playing 11 : रहाणे करणार प्लेइंग 11 मध्ये 2 बदल! या खेळाडूंना मिळणार संघात संधी
दुसरीकडे, कोहलीच्या व्यावसायिक हितसंबंधांची काळजी घेणारी सल्लागार कंपनी स्पोर्टिंग बियॉन्डने या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. कोहली आता अॅजिलिटास या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत काम करत आहे, ज्याची स्थापना २०२३ मध्ये पुमा इंडिया आणि आग्नेय आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी केली होती. ही कंपनी त्याच्या जीवनशैलीचा आणि अॅथलेटिक ब्रँड One8 चा विकास पुढे नेईल, जो कोहली जागतिक स्तरावर घेऊन जाऊ इच्छितो.
या स्पर्धमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत या 5 सामन्यात त्याने 186 धावा केल्या आहेत. कोलकता नाइच राइडर्स विरूध्द 59 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. चेन्नई विरूध्द त्याने 31 धावा केल्या होत्या. गुजरात विरूध्द विराटने फक्त 7 धावा करुन बाद झाला होता. मुबंई इंडीयन्स विरुध्द त्याने 67 धावा केल्या होत्या. दिल्ली विरूध्द त्याने 22 धावा केल्या आणि झेलबाद झाला होता.