फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मिडीया
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकता नाईट राईडर्स यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सीएसकेच्या संघाची या सिझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. संघाने या हंगामाचे 5 सामने खेळले आहेत यामध्ये त्याना फक्त 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. केकेआरच्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाचे पाच सामने झाले आहेत यामध्ये त्यांना 2 सामन्यामध्ये विजय मिळाला आहे तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईच्या संघामध्ये मोठा बदल झाला आहे, यामध्ये संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाड हा जखमी झाला आहे त्यामुळे तो स्पर्धतून बाहेर झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना चेपॉक येथे संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
रुतुराज गायकवाड स्पर्धबाहेर झाल्यामुळे केकेआरविरुध्द सामन्यात एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर कर्णधार अजिंक्य रहाणे देखील केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल करू शकतो. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर, प्लेइंग इलेव्हनमध्ये हा बदल दिसून येऊ शकतो. केकेआर संघ सीएसके विरुद्धचा सामना जिंकून विजयी मार्गावर परत येऊ इच्छितो.
Another chapter of the timeless rivalry unfolds tonight, in #IPLRivalryWeek! 💛💜
Who will seize victory, and who will be ‘Denied’ two points? 💥#IPLOnJioStar 👉 #CSKvKKR | FRI 11 APR, 6:30 PM on Star Sports Network and JioHotstar! pic.twitter.com/GKKWe6Uj41
— Star Sports (@StarSportsIndia) April 11, 2025
जरी त्याच्यासाठी हे सोपे नसले तरी, आज डी कॉकला केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमधून निश्चितच वगळले जाऊ शकते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने ९७ धावांच्या खेळी खेळली होती, त्यानंतर त्याची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. अशा परिस्थितीत, या खेळाडूला कारवाईचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनलाही वगळता येईल.
CSK vs KKR : आज कोण ठरणार वरचढ? अजिंक्यसेना करणार धोनी सेनेशी दोन हात, जाणून घ्या A टू Z माहिती..
डी कॉकला वगळून, कर्णधार रहाणे रहमानुल्ला गुरबाजला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकतो. फिल साल्टच्या जाण्यानंतर गुरबाजने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. तथापि, त्याला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. याशिवाय, मोईन अलीला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. गेल्या वेळी सुनील नरेनच्या अनुपस्थितीत मोईनने चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे, चेपॉकची खेळपट्टी देखील फिरकीला अनुकूल मानली जाते, त्यामुळे आज नरेन-चक्रवर्ती आणि मोईन हे त्रिकूट सीएसकेच्या फलंदाजांना त्रास देऊ शकतात.
रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कप्टन), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि वैभव अरोरा.