DC vs RCB: Make a noise! But, 'King' Kohli's weakness? He created a new record, becoming the only batsman to do so..
IPL २०२५ : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा हंगामाला चांगलाच रंग चढला असून क्रिकेटप्रेमींना प्रत्येक दिवस नवीन काही पर्वणी मिळत आहे. ज्यामुळे त्यांचे मोठे मनोरंजन होत आहे. काल १० एप्रिलला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात २४ वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आपला खेळ उंचावत आरसीबीला पराभूत केले आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या फायद्याचा ठरला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या बेंगळुरूकडून फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची दमदार सुरुवात केली. या दोघांनी केवळ ३ ओव्हरमध्ये ५३ धावा फटकावल्या. परंतु संघाला १६३ धावाच करता आल्या. या दरम्यान विराट कोहलीने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांतर तो २२ धावांवर विप्राज निगमचा बळी ठरला.
हेही वाचा : CSK vs KKR : CSK ला कर्णधार धोनी विजयी रुळावर आणणार? केकेआरविरुद्ध आज खरी कसोटी…
विराट कोहलीसाठी विशेष बाब म्हणजे त्याने हा विक्रम आरसीबीच्या होम ग्राउंड म्हणजे एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर केला आहे. तर दुसरीकडे, फिलिप सॉल्टने या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याने मिचेल स्टार्कच्या एकाच षटकात ३० धावा फटकावल्या. परंतु त्याला धावबाद होऊन तंबूत परतावं लागलं. तर दुसऱ्याबाजूला विराट कोहली आपली खेळी पुढे घेऊन जात होता. या सामन्यात त्याने काही शानदार चौकार देखील लगावले. तसेच या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात तो आयपीएलच्या इतिहासात १००० चौकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा एक अनोखा विक्रम ठरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात चौथा षटक टाकायला दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल आला होता. या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीने चौकार लगावला. या चौकरासह विराट कोहलीने आयपीएलमधील त्याचा १००० वा चौकार पूर्ण केला. कोहलीने आयपीएलच्या २४९ डावांमध्ये हा कारनाम करून दाखवला आहे. एकूणच, आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने २४९ डावांमध्ये १००१ चौकार लगावले आहे.
हेही वाचा : IPL 2025 : पाकिस्तानकडून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर बंदी, ‘त्या’ कराराकडे दुर्लक्ष करणे भोवले…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेडलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.