Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं

Virat Kohli Team Respond to Meeting Premanand maharaj 5 cr Allegations: वृंदावनमधील फलाहरी बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिनेश शर्मा यांनी विराट कोहलीवर आरोप केले 5 कोटी घेतल्याचे आरोप केले होते. आता यावर कोहलीच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 02:12 PM
Virat Kohli Team Respond to Meeting Premanand maharaj

Virat Kohli Team Respond to Meeting Premanand maharaj

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीवरील 5 कोटींच्या आरोपांनी खळबळ
  • कोहलीच्या टीमने आरोप फेटाळले
  • माध्यमांना दिला ‘हा’ स्पष्ट संदेश
Virat Kohli: फलाहारी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिनेश शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर एक गंभीर आरोप केला आहे. फलाहारी बाबांनी असा आरोप केला आहे की, कोहलीने वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज यांना भेटण्यासाठी ५ कोटी रुपये घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर हे आरोप आधीच खोटे असल्याचे फेटाळले जात होते. आता, विराट कोहलीच्या टीमने या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. टीमने प्रसारमाध्यमांनाही आवाहन केले आहे.

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

विराट कोहलीच्या टीमने आरोपांवर काय म्हटले?

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीवर आरोप ५ कोटी घेऊन प्रेमानंद महाराजांना भेट दिल्याचे आरोप केले जात आहेत. आता, यावर पहिली प्रतिक्रिया देताना, विराट कोहलीच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, ‘आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, फलाहरी महाराज दिनेश शर्मा यांनी श्री. विराट कोहली यांच्याबाबत केलेले दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहेत. विराट कोहली हे केवळ त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेतून प्रेमानंद महाराजजींना भेटतात.’

फलाहारी बाबांच्या आरोपांनंतर, एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पसरू लागल्या. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. तेव्हापासून विराट कोहलीच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रसारमाध्यमांना केलेल्या एका मोठ्या आवाहनात, विराटच्या टीमने म्हटले आहे, ‘ आम्ही हे दावे पूर्णपणे फेटाळून लावतो आणि प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, अशी विधाने प्रकाशित करण्यापूर्वी किंवा प्रसारित करण्यापूर्वी त्यांनी तथ्यांची योग्य चौकशी व पडताळणी करावी आणि जबाबदारीने रिपोर्टिंग करावे.’

 

विराट आणि अनुष्का यांनी २०२३ मध्ये पहिल्यांदा आश्रमाला दिली भेट

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०२३ मध्ये पहिल्यांदा प्रेमानंद महाराजांना भेट दिली होती. तेव्हापासून, किंग कोहली जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वृंदावनला भेट देत असतो. या काळात कोहलीने आपली मुलगी वामिका आणि मुलगा अकाय कोहली यांनाही सोबत नेले होते. विराटने बाबा नीम करोली यांच्या आश्रमालाही भेट दिली आहे.

विराट कोहली नुकतेच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तो आता न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ४ नोव्हेंबरपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीकडून पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. कोहलीने मागील मालिकेतही एक शानदार शतक झळकावले होते.

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

Web Title: Virat kohli team response premanand maharaj meeting 5 crore allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • King virat Kohli
  • Premanand Maharaj
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
1

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

ODI Worldcup 2027 : विश्वचषक खेळण्याची ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी, जाणून घ्या कोणाला लागणार लॉटरी ?
2

ODI Worldcup 2027 : विश्वचषक खेळण्याची ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी, जाणून घ्या कोणाला लागणार लॉटरी ?

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा
3

ICC ODI Worldcup : 2027 वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक उद्या होणार जाहीर, जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
4

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.