WCL 2025: "I won't be playing in that match.."; Gabbar gets angry over India-Pakistan WCL match, Shikhar Dhawan's video goes viral
WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड् (डब्ल्यूसीएल) २०२५ स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून यापूर्वी बराच गदारोळ झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांनंतर अधिक बिघडलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाविरुद्ध २० जुलैला होणारा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा सामन रद्द झाला होता. त्यानंतर आता जर हे दोन संघ उपांत्य सामन्यात आमने-सामने आले तर काय करणार असा प्रश्न शिखर धवनला विचारण्यात आल्यानंतर तो भडकल्याचे दिसला. सातत्याने या विषयावर प्रश्न विचारण्यात येत असल्याने तो चिडला होता.
दरम्यान, २० जुलैपूर्वीच शिखर धवनने सोशल मीडियावर त्याची भूमिका मांडणारी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने स्पष्ट केले होते की तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा भाग होणार नाही. याबाबत त्याने संघाला कळवले आहे. त्यानंतर असेही समोर आले की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून शिखरसह हरभजन सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाणसह इतर भारतीय खेळाडूंनीही या सामन्यातून माघार घेतली होती. परिणामी हा सामना रद्द झाला. त्यावर आयोजकांनीही माफी मागितली. यानंतर आता एक व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे.
तो म्हणाला, ‘एकतर तू चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या ठिकाणी हा प्रश्न विचारत आहेस. तू हा प्रश्न विचारायला नको होता. पण आता विचारलास आहेस, तर मी उत्तर देतो. जसं मी आधी खेळायला नकार दिला, तसेच मी यापुढेही खेळणार नाही.’
Shikhar Dhawan angry reply on If Pakistan reaches the semi-final against you… will you still play, or ask for a day off? 😄🇵🇰🇮🇳 #WCL25 pic.twitter.com/d96yRQpsp2
— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) July 26, 2025
हेही वाचा : Ind vs Eng 4th Test : आर अश्विनने बेन स्टोक्सला दाखवला आरसा! ही तुमची निराशा आहे, आमची समस्या नाही…
दरम्यान भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर त्यावरून अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. शाहिद आफ्रिदीसह अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनी टीका केली, तर भारतातून अनेकांनी या निर्णयाला समर्थनदेण्यात आले होते. तसेच हा सामना रद्द झाल्याने भविष्यातील या दोन देशातील सामन्यांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.