राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय (Commonwealth Games 2022) वेटलिफ्टर पदकांची लयलूट करीत असून सोमवारी रात्री वेटलिफ्टर हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्य पदकाची (Bronze medal) कमाई केली. हरजिंदर कौर ही मूळची पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील नाभा येथील रहिवासी आहे. तेव्हा पंजाबच्या भूमीतील एका खेळाडूने कांस्य पदक प्राप्त करून भारताची मान उंचावल्यामुळे हरजिंदर हिला पंजाब सरकारने मंगळवारी तिला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारी भारताच्या खात्यात ज्युदोच्या दोन पदकांची भर पडली. २७ वर्षीय सुशीलादेवी लिकबामामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय बॅडमिंटनपटूंनीही अंतिम फेरीत प्रवेश करत एक पदक निश्चित केले आहे. तर वेटलिफ्टर हरजिंदर कौरने देखील कांस्य पदकांची कमाई केल्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदक संख्या ही ९ इतकी झाली आहे.
ਰਾਸ਼ਟਰਮੰਡਲ ਖੇਡਾਂ ਵਿੱਚ ਨਾਭਾ ਨੇੜਲੇ ਪਿੰਡ ਮੈਹਸ ਦੀ ਜੰਮਪਲ ਹਰਜਿੰਦਰ ਕੌਰ ਵੱਲੋਂ ਵੇਟ ਲਿਫਟਿੰਗ ‘ਚ ਕਾਂਸੀ ਦਾ ਤਮਗਾ ਜਿੱਤਣ ‘ਤੇ ਵਧਾਈਆਂ…
ਹਰਜਿੰਦਰ ਤੁਸੀਂ ਪੰਜਾਬ ਦੀਆਂ ਬੱਚੀਆਂ ਲਈ ਪ੍ਰੇਰਣਾਸਰੋਤ ਬਣੋਗੇ…ਤੁਹਾਡੇ ਮਾਪੇ ਅਤੇ ਕੋਚ ਸਾਹਿਬਾਨ ਨੂੰ ਵੀ ਵਧਾਈਆਂ…ਚੰਗੇ ਭਵਿੱਖ ਲਈ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ…
ਚੱਕਦੇ ਇੰਡੀਆ…. pic.twitter.com/qtn3lkgHJ5
— Bhagwant Mann (@BhagwantMann) August 2, 2022
हरजिंदर हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विटरद्वारे हरजिंदरचे अभिनंदन केले आहे. यात त्यांनी हरजिंदर ही पंजाबच्या प्रत्येक मुलींसाठी एक प्रेरणा असून ट्विटमध्ये तिच्या कुटुंबाला आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी पंजाब सरकारच्या क्रीडा धोरणानुसार हरजिंदरला ४० लाखांचे बक्षीस जाहीर केले.