
photo- social media
नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे तिन्ही देश २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सहआयोजन करतील. सह-यजमान म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट प्रवेश मिळेल. या व्यतिरिक्त, आयसीसी एकदिवसीय क्रमवारीच्या आधारावर आठ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. थेट पात्रतेसाठी क्रमवारीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, वेस्ट इंडिज ७३ गुणांसह १० व्या स्थानावर घसरला होता. बांग्लादेश ८३ गुणांसह ९ व्या स्थानावर आणि अफगाणिस्तान ९० गुणांसह ७ व्या स्थानावर होता.
२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज थेट पात्र ठरू शकला नाही आणि स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी त्यांना पात्रता फेरीत खेळावी लागली. चार वर्षांनंतर, २०२३ च्या विश्वचषकात संघाला आणखी मोठा धक्का बसला. वेस्ट इंडिज पात्रता फेरीतच बाहेर पडला आणि मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीच्या सुपर सिक्स टप्प्यात झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सकडून झालेल्या पराभवांनी त्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या. त्यानंतर स्कॉटलंडकडून झालेल्या पराभवांनी विश्वचषकातून वेस्ट इंडिज विश्वचषकसाठी पात्र ठरु शकला नाही. आता, २०२७ च्या विश्वचषकात स्थान निश्चित करण्यासाठी संघ पुन्हा एकदा पात्रता फेरीत खेळण्याच्या स्थितीत आहे.
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील मालिका वेस्ट इंडिजसाठी अत्यंत महत्त्वाची होती. थेट पात्रतेच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आयर्लंडला दमदार कामगिरी करायची होती. पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांना ५-० ने विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे आयर्लंडच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ९२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे अफगाणिस्तानची स्थिती अधिक मजबूत झाली आणि वेस्ट इंडिजच्या थेट पात्रतेची संधी जवळजवळ संपुष्टात आली.
वेस्ट इंडिज सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना २७ सप्टेंबरला, दुसरा ३० सप्टेंबरला आणि तिसरा ३ ऑक्टोबरला खेळला जाईल. परंतु, वेस्ट इंडिजने ही मालिका ३-० ने जिंकली तरीही, थेट पात्रतेचे समीकरण त्यांच्या बाजूने बदलणार नाही. त्यामुळे त्यांना आता पात्रता फेरीच्या माध्यमातून २०२७ च्या विश्वचषकातील स्थानासाठी तयारी करावी लागेल.
6,6,6… मियाँ मॅजिक! चेंडूने नाही, बॅटने केला कहर; Mohammed Siraj ची तुफानी फटकेबाजी, VIDEO व्हायरल