
IND VS WI T20 Series
भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आजच्या सामन्यात संघात बदल करून वैभवला संधी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर कर्णधार श्रेयस अय्यरने वैभवला प्लेईंग ११ (Playing 11) मध्ये स्थान दिले, तर आजचा दिवस वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीसाठी महत्वाचा ठरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत वेस्टइंडिजवर विजय मिळवला होता.
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
गेले अनेक सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आलेली नाही. अनेक सामन्यात अन्य फलंदाज काही प्रमाणात अपयशी ठरले असले तरी देखील त्याला एकही संधी दिली गेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे किमान आजच्या तरी सामन्यात संघ व्यवस्थापन आणि कर्णधार श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी देणार का हे पहावे लागणार आहे.
कमी वयात आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते का, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. जर त्याला आज संधी मिळाली, तर तो रांचीच्या मैदानावर इतिहास रचण्यासाठी सज्ज असेल. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील टी-२० सिरिजदरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या निवडीबाबत एक अत्यंत रंजक आणि दुर्मिळ योगायोग समोर आला आहे. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत भारतासाठी ८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याला अद्याप मायदेशात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
वैभवला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करण्याची पहिली संधी थेट इंग्लंड दौऱ्यावर मिळाली होती. यानंतर तो झिम्बाब्वे दौऱ्यावरही भारतीय संघाकडून मैदानात उतरल्याचे दिसून आले. जसे सामने भारतात खेळवले जाऊ लागतात, तसे वैभवला भारतीय १५ खेळाडूंच्या संघात स्थान दिले जाते, मात्र अंतिम ११ मध्ये जागा दिलीच जात नसल्याचे दिसून येत आहे.