Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

IND Vs NEP : एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत 'ए'ने नेपाळसमोर 333 धावांचे आव्हान ठेवले. तिलक वर्माने 107, तर कुमार कुशाग्रने 117 धावांची शतकी खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी रचली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 20, 2026 | 08:00 PM
IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

Follow Us
Follow Us:
  • सूर्यवंशी, अभिषेक शर्मा सपशेल फेल
  • तिलक-कुमारची दोनशे धावांची भागीदारी
  • नेपाळची दमदार गोलंदाजी
IND Vs NEP : दोहा येथे सुरू असलेल्या ACC Mens Asia Cup Rising Stars मधील पहिल्या सामन्यात भारत ‘ए’ ने नेपाळसमोर 333 धावांचे बलाढ्य आव्हान दिले आहे. सुरुवातीला पडलेल्या धक्क्यातून सावरत भारताने कर्णधार तिलक वर्मा (107) व यष्टीरक्षक कुमार कुशाग्र (117) यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 332 धावा केल्या.

आता भारतीय गोलंदाजांना या धावांचा यशस्वीरित्या बचाव करावे लागेल. भारताने या स्पर्धेत आपला ‘ए’ संघ उतरवला असून नेपाळचा राष्ट्रीय संघ यात सहभागी झाला आहे. नेपाळच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली.

सूर्यवंशी, अभिषेक शर्मा सपशेल फेल

नेपाळविरुद्ध सलामीला आलेली जोडी वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र नेपाळच्या गोलंदाजांचा ते सामना करू शकले नाहीत. वैभवने 3 चौकार व 1 षटकारच्या मदतीने 26 धावा केल्या असल्या तरी तो जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पवन सराफने चक्क त्याला क्लीनबोल्ड केले. तर अभिषेक हा नंदन यादवचा शिकार ठरला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आलेला आयुष बदोनी फक्त 2 धावाच करू शकला. अशाप्रकारे दहाव्याच षटकात भारताची अवस्था 3 बाद 42 धावा अशी झाली.

Innings Break! Superb centuries from Captain Tilak Varma and Kumar Kushagra propel India A to 3️⃣3️⃣2️⃣ 🎯 Over to the bowlers now ⏳ Scorecard ▶️ https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/eYhdGF6xyf — BCCI (@BCCI) November 20, 2026

 

Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही’; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप

तिलक-कुमारची दोनशे धावांची भागीदारी

संघ संकटात सापडलेला असताना कर्णधार तिलक वर्मा व कुमार कुशाग्रने मोर्चा आपल्याकडे घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी चक्क 191 चेंडूंत 206 धावांची भागीदारी रचली. तिलकपेक्षा कुशाग्र थोडा आक्रमक दिसला. त्याने 102 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या, तर तिलकने 113 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकात 107 धावा रचल्या.

IND Vs NZ: क्रिकेटविश्वात हाहा:कार! ‘सिराजला वगळण्यासाठी तब्बल महिनाभर…’; R. Ashwin चे विधान नेमके काय?

नेपाळची दमदार गोलंदाजी

भारताचा हा ‘ए’ संघ असला तरी संघात दमदार खेळाडूंचा भरणा आहे. असे असतानाही नेपाळच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली. त्यांच्याकडून संदीप लामिचिने व ललित राजबंसी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर नंदन यादवने 2 आणि पवन सराफने एक विकेट मिळवली. त्यांचे क्षेत्ररक्षणही छान होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत 'ए'ने नेपाळसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवले?

    Ans: भारत 'ए'ने 50 षटकांत 9 बाद 332 धावा केल्या. त्यामुळे नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य आहे.

  • Que: भारताकडून शतके कोणी झळकावली?

    Ans: कर्णधार तिलक वर्माने 107, तर कुमार कुशाग्रने 117 धावा केल्या.

  • Que: तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्यात किती धावांची भागीदारी झाली?

    Ans: दोघांनी चौथ्या विकेटसाठी 191 चेंडूंत 206 धावांची भागीदारी केली.

Web Title: Ind vs nep asia cup rising stars 2026 tilak varma kumar kushagra centuries rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Tilak Verma
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला!
1

Blind Asia Cup : बांगलादेशला नमवत भारताची फायनलमध्ये धडक; 20 नोव्हेंबरला पाकिस्तानशी महामुकाबला!

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…
2

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?
3

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.