MI vs SRH: What did Suryakumar Yadav do? Abhishek Sharma's pockets were checked in the live match and...
MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३३ वा सामना काल पार पडला. वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड यांची जादू चालली नाही. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केळे आणि विजय संपादन केला. या सामन्यात एक मजेदार घटनाद देखील घडली. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मासोबत मस्करी करताना दिसून आला आहे. त्याने आत काही आहे का? हे बघण्यासाठी शर्माचे खिसे तपासले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर अभिषेक शर्माने खिशातून एक स्लिप काढून आनंद साजरा केला होता. त्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर देखील ती स्लिप वाचताना दिसला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मासोबत मस्ती करताना खिसे तपासले. सूर्यकुमार यादवला पुन्हा खिशात काही स्लिप ठेवत आहे का? हे तपासायचे होते.
हेही वाचा : IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी
याबद्दल, सूर्यकुमारने सामन्यादरम्यान अभिषेकच्या खिशाला मजा करत शोधले आणि दोन्ही खेळाडू हसताना दिसून आले. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होऊ लागला आहे.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करायला सनरायझर्स हैदराबाद मैदानात उतरले. त्यांनी २० षटकांत ५ गडी गमावून १६२ धावा केल्या. हैदराबादची सुरुवात चांगली झाली पण मधल्या षटकांमध्ये धावा काढण्यात संघाला खूप संघर्ष करावा लागला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ४०, ट्रॅव्हिस हेडने २८, नितीश रेड्डीने १९, क्लासेनने ३७ आणि अनिकेत वर्माने नाबाद १८ धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्सने २, बुमराहने १, हार्दिक पंड्याने १ आणि बोल्टने १ विकेट मिळवली.
pic.twitter.com/jjE4cpoexd https://t.co/zLCozmFpkf
— 𝘽²⁶⁹ (@mallichudam) April 17, 2025
प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने या लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्स गमावून सामना आपल्या नावे केला. मुंबईकडून रायन रिकेल्टनने ३१, रोहित शर्माने २६, विल जॅक्सने ३६, सूर्यकुमार यादवने २६, तिलक वर्मा यांनी २१ आणि हार्दिक पंड्याने २१ धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका वठवली. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्सने ३, इशान मलिंगाने २ आणि हर्षल पटेलने १ विकेट घेतली.