केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
Happy Birthday KL Rahul : भारतीय संघाचा विश्वासार्ह फलंदाज म्हणून केएल राहुलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज १८ एप्रिल रोजी त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. केएल राहुलने आतापर्यंत भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये देखील अशा अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतील. फलंदाजीव्यतिरिक्त, त्याने विकेटकीपिंगमध्ये देखील मोठे योगदान दिले आहे. आता तो भारतीय एकदिवसीय संघात नियमित यष्टीरक्षक म्हणून खेळत आहे.
राहुलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायच झालं तर, केएल राहुलने पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. त्यानंतर, त्याने आयपीएलमधील काही सर्वोत्तम संघांचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. केएल राहुल सध्याच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतआहे. या हंगामातही केएल राहुल दिल्लीसाठी शानदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, आयपीएलच्या इतिहासाच्या बाबतीत, २०२० ते २०२२ हा काळ केएल राहुलसाठी सर्वोत्तम ठरला आहे.
हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या बचावासाठी नितीश राणा मैदानात, म्हणाला, सुपर ओव्हरमधील ‘तो’ निर्णय योग्यच…
यादरम्यान, केएल राहुलने आयपीएलमध्ये अनेक शानदार खेळी खेळल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. चला आयपीएलमधील केएल राहुलच्या टॉप-५ डावांबद्दल जाणून घेऊया. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकली आहेत.
पाच वर्षांपूर्वी, केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला होता. पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना, त्याने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाबाद १३२ धावा काढल्या होत्या. त्याच्या शतकाच्या जोरावर त्याने आपल्या संघाला ९७ धावांनी मोठा विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्या सामन्यात त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारले.
१६ एप्रिल २०२२ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना ६० चेंडूत १०३ धावा फटकावल्या होत्या. त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार लगावले होते. त्याहकया खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. तसेच त्या सामन्यात एलएसजीला १८ धावांनी विजय मिळाला होता.
केएल राहुलने त्याच्या शतकानंतर फक्त आठ दिवसांतच म्हणजे २४ एप्रिल २०२२ रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक झळकावले होते. तो लखनौ सुपर जायंट्ससाठी ६२ चेंडूत १०३ धावा करत नाबाद राहिला होता.
हेही वाचा : IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी
सहा वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलने आयपीएलमध्ये आपले पहिले शतक झळकावले होते. या राहुलने ६४ चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह १०० धावा केल्या होत्या. परंतु हा सामना मात्र मुंबईने आपल्या खिशात टाकला होता.
केएल राहुलच्या आयपीएलमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाणारी खेळी त्याने आयपीएल २०२५ च्या या हंगामात साकारली आहे. तो आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध केएल राहुलने शानदार कामगिरी केली. राहुलने ५३ चेंडूत ९३ धावा केल्या होत्या.